ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा सक्षमतेसाठी ‘जलमहोत्सव’
ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा
सक्षमतेसाठी ‘जलमहोत्सव’
खेबुडकर ः परुळेबाजारमध्ये उद्या उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ६ : ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत, मजबूत करणे आणि त्यामध्ये सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात ८ ते २२ मार्च या कालावधीत ‘जल महोत्सवा’चे आयोजन केले आहे. या महोत्सवाचा प्रारंभ वेंगुर्ले तालुक्यातील परुळेबाजार येथे रविवारी (ता. ८) होणार आहे. याप्रसंगी भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री श्री. व्ही. सोमाण्णा, विभागाचे सचिव अशोककुमार मीना, संचालक प्रदीप सिंग यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. ही माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी आज दिली.
महोत्सवात ८ ते २२ मार्च या काळात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विविध उपक्रम राबवले जातील. पाणी ही केवळ पायाभूत सुविधा नसून ती एक सांस्कृतिक परंपरा आहे, या भावनेतून पाण्याचे जतन केले जाणार आहे. गावागावांत पाणी तपासणीसाठी महिलांना प्रोत्साहन दिले जाणार असून, ‘फिल्ड टेस्टिंग किट’द्वारे पाण्याची गुणवत्ता तपासली जाईल. जलसंवर्धनामध्ये युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रत्येक गावात ‘यंग ब्रिगेड’ची स्थापना केली जाईल. विद्यार्थ्यांमध्ये जलसाक्षरता निर्माण करण्यासाठी शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. ग्रामपंचायत विकास आराखड्यात पाणी संवर्धनाच्या कायमस्वरुपी उपाययोजनांचा समावेश केला जाईल. हा महोत्सव पूर्णपणे लोकसहभागावर आधारित असून गाव आणि पंचायत समिती स्तरावर ‘लोक जल उत्सव’ आयोजित केले जातील. आरोग्य, पोषण आणि महिला सक्षमीकरणाला जलसेवेशी जोडणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
---
जलस्रोतांसाठी पुढाकार घ्या!
या मोहिमेंतर्गत पाणी पुरवठा योजनांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी कुशल मनुष्यबळ तयार करणे, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे, परिसराची स्वच्छता आणि सामुदायिक शपथ घेणे यावर भर दिला जाईल. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी आपल्या गावातील जलस्रोतांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

