सावंतवाडी पंचायत समिती
भाजपच्या गटनेतेपदी धुरी

सावंतवाडी पंचायत समिती भाजपच्या गटनेतेपदी धुरी

Published on

28995

सावंतवाडी पंचायत समिती
भाजपच्या गटनेतेपदी धुरी

सभापती, उपसभापती निवड सोमवारी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ ः तालुका पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड सोमवारी (ता. ९) होत असून, भाजपकडून गट स्थापन करण्यात आला आहे. गटनेतेपदी बिनविरोध निवडून आलेले महेश धुरी यांची निवड करण्यात आली आहे.
भाजपच्या पंचायत समिती सदस्यांकडून आज गट स्थापन करण्यात आला आहे. सभापती पद आरक्षित असल्याने ते शिवसेनेच्या वाट्याला गेले असून, भाजपकडून उपसभापतिपदी दावा‌ केला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज गट स्थापन करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य प्राजक्ता केळूसकर, धनश्री मराठे, नेहा कांबळी, गौरव मुळीक, प्रशांत सुकी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com