‘गोवा धाडसकळ’चा रोमहर्षक विजय

‘गोवा धाडसकळ’चा रोमहर्षक विजय

Published on

28999

‘गोवा धाडसकळ’चा रोमहर्षक विजय

डे-नाईट क्रिकेट स्पर्धा; उपांत्य फेरीत दाखल, नीतेश ‘सामनावीर’

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ७ ः प्रिन्स पोर्ट क्लब, समादेवी मित्रमंडळ कुडाळ व कलेश्वर मित्रमंडळ नेरुर यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराज्यीय डे-नाईट क्रिकेट स्पर्धेत आज दुसऱ्या दिवशी गोवा राज्यातील धाडसकळ या संघाने उपांत्य फेरीमध्ये आपले स्थान निश्चित केले. स्पर्धेला कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
आजचा पहिला सामना लाजरी इलेव्हन कुडाळ व प्रिन्स इलेव्हन कुडाळ यांच्यामध्ये झाला. प्रिन्स इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना ३८ धावा जमवल्या. प्रत्युतरादाखल लाजरी इलेव्हनच्या शुभम आरोलकर यांच्या २२ धावांच्या जोरावर लाजरी इलेव्हनने विजय प्राप्त केला. या संघाच्या शुभम आरोलकर याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
दुसऱ्या सामना धाडसकळ गोवा व यशोदा वारियर्स कुडाळ या संघांमध्ये  झाला. गोवा संघाने सूरज गावडेच्या ३९ धावांच्या जोरावर मर्यादित षटकांमध्ये ६९ धावा जमवल्या. त्याला उत्तर देताना जोएल नाईकची २३ धावांची खेळी संघाला विजय प्राप्त करून देऊ शकली नाही. धाडसकळ संघाचा सूरज गावडे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
तिसऱ्या सामन्यात धाडसकळ गोवा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. लाजरी संघाने २३ धावा जमवल्या. गोवा संघाच्या विकी पुजारी याने नऊ धावा देत तीन गडी बाद करून संघाच्या विजयामध्ये मोलाचे योगदान दिले. २४ धावांचे आव्हान गोवा संघाने सहजरित्या पार केले. विकी पुजारी याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. चौथा सामना प्रिन्स इलेव्हन व यशोदा वॉरियर्स यांच्यामध्ये झाला. प्रथम फलंदाजी करताना प्रिन्स इलेव्हन संघाने २५ धावा जमवल्या. त्याला उत्तर देताना सोनू कानडेच्या तेरा धावांच्या जोरावर हा सामना यशोदा वॉरियर्स संघाने सहजरित्या जिंकला. यशोदा वॉरियर्स संघाच्या सोनू कानडे याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. पाचवा सामना यशोदा वॉरियर्स व लाजरी इलेव्हन या संघांमध्ये झाला. प्रथम फलंदाजी करताना यशोदा संघाने ४४ धावा जमवल्या. त्याला उत्तर देताना शुभम आरोलकर याच्या ३१ धावांच्या जोरावर लाजरी इलेव्हन संघ विजयी झाला. या संघातील शुभम आरोलकरला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
----------
अचूक गोलंदाजीने ‘लाजरी’ला रोखले
दिवसभरातील शेवटचा उपउपांत्य फेरीचा सामना लाजरी इलेव्हन कुडाळ व धाडसकळ गोवा या दोन संघांमध्ये झाला. धाडसकळ संघाने प्रथम फलंदाजी करताना नीतेश याच्या २४ धावांच्या जोरावर मर्यादित षटकांमध्ये ५० धावा जमवल्या. गोवा संघाने अचूक गोलंदाजीच्या जोरावर लाजरी इलेव्हन संघाला विजयापासून रोखले व दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. गोवा संघातील नीतेश याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून उमेश मांजरेकर, बंटी केरकर, मंगेश धुरी, संदीप रुद्रे यांनी काम पाहिले. समालोचन काका सावंत, राजा सामंत, बादल चौधरी, विजय बागायतकर, शेखर दळवी यांनी, गुणलेखन रुपेश कुडाळकर, सचिन कांबळी, समीर राणे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com