शिंब्रादेवी व फोक्राई देवींचा ऐतिहासिक पालखी भेट
- rat६p७.jpg -
२६O२८९३३
संगमेश्वर ः तालुक्यातील ओझरे बुद्रूक येथे शिंब्रादेवी आणि फोक्राई देवी या दोन भगिनींचा ऐतिहासिक पालखी भेट सोहळा साजरा करताना ग्रामस्थ.
-----
शिंब्रादेवी, फोक्राई देवींची पालखी भेट
ओझरे बुद्रूक येथे रंगला सोहळा ; भाविकांची गर्दी
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ६ ः संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या ओझरे बुद्रूक येथे ओझरेची ग्रामदैवत आई शिंब्रादेवी आणि निनावे गावची ग्रामदेवता आई फोक्राई देवी या दोन भगिनींचा ऐतिहासिक पालखी भेट सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.
दरवर्षीप्रमाणे ओझरे बुद्रूक येथील पारंपरिक होळीच्या माळावर हा पालखी भेट सोहळा संपन्न झाला. ‘आई साहेबांच्या नावाने’ होणारा जयघोष, फटाक्यांची भव्य आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या कडकडाटात दोन्ही पालख्यांची भेट झाली. हा क्षण डोळ्यांत साठवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यासह परराज्यातूनही हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पालख्यांची भेट झाल्यानंतर परंपरेनुसार दोन्ही पालख्या होळीच्या माळावर विराजमान झाल्या. त्यानंतर विधिवत जपसाल आणि नैवेद्य दाखवून दर्शन सोहळ्याला सुरुवात झाली. दोन्ही देवींची ‘जागृत देवस्थान’ आणि ‘नवसाला पावणारी माता’ अशी ख्याती असून, संकटकाळात देवी सदैव रक्षण करते, अशी ग्रामस्थांची गाढ श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविकांनी दर्शनासाठी मैलोन् मैल लांब रांगा लावल्या होत्या.
या उत्सवाचे नेटके नियोजन ग्रामविकास मंडळ ओझरे बुद्रूक (मुंबई) यांच्या वतीने करण्यात आले होते. मंडळाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे हा उत्सव समाजासमोर एक आदर्श ठरला. या वेळी मंडळाचे अध्यक्ष दत्ताराम जयराम हातीम, सरचिटणीस श्रीकांत श्रीपत हातीम, कार्याध्यक्ष विश्वनाथ गणपत लाड, खजिनदार दीपक काशिराम हातीम यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणी, मानकरी, गावकर, पुजारी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

