हिवताप निर्मूलनासाठी ३१० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
- rat६p९.jpg-
२६O२८९३६
रत्नागिरी ः हिवताप निर्मूलनासाठी आयोजित प्रशिक्षण शिबिरात सहभागी आरोग्य विभागाचे कर्मचारी.
----
हिवताप निर्मूलनासाठी ३१० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
पुणे नॉलेज क्लस्टरचा पुढाकार ; रत्नागिरी, चिपळुणात आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ ः भारत सरकारच्या २०३० पर्यंतच्या ‘हिवतापमुक्त भारत’ या राष्ट्रीय उद्दिष्टाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी विशेष पाऊल उचलण्यात आले आहे. पुणे नॉलेज क्लस्टर आणि जिल्हा हिवताप कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सक्षम’ या कीटकजन्य रोगांवरील प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी आणि चिपळूण येथे पार पडलेल्या या कार्यशाळेत जिल्ह्यातील एकूण ३१० बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
आरोग्य विभागाच्या या प्रशिक्षणादरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांना डेंगी, हिवताप आणि चिकनगुनिया यांसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यात कीटकजन्य रोगांचे अचूक निदान आणि सर्वेक्षण प्रणालीचा वापर, डासांचे जीवनचक्र व त्यांची जैववैशिष्ट्ये आणि उत्पत्ती स्थाने निश्चित करणे, हवामान व पर्यावरणीय बदलांचा रोगप्रसारावर होणारा परिणाम, क्षेत्रपातळीवरील अचूक माहिती संकलनाचे महत्त्व अधोरेखित करणे, तज्ज्ञ व्याख्याने आणि कृतीआधारित उपक्रमांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रीय कामात उपयोगी ठरणारे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले.
रत्नागिरी येथील कार्यशाळेला जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव उपस्थित होते, तर चिपळूण येथील सत्राला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. मुरलीधर तांबे, डॉ. सचिन धांडे आणि सुनील देशमुख यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली.
पुणे नॉलेज क्लस्टरच्या चिन्मय स्वामी, श्रेयस दिलीप खाडे, शीतल नागपुरे आणि जान्हवी अग्रवाल यांच्या टीमने या कार्यशाळेचे यशस्वी नियोजन केले. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने या टीमच्या नियोजनबद्ध कार्याचे विशेष कौतुक केले आहे. अशा प्रकारच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणांमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट होत असून, हिवताप निर्मूलनाच्या मोहिमेला मोठी गती मिळेल, असा विश्वास जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

