सावंतवाडीत रंगपंचमी जल्लोषात

सावंतवाडीत रंगपंचमी जल्लोषात

Published on

swt616.jpg
29003
सावंतवाडी : रंगपंचमीनिमित्त जल्लोष करताना सावंतवाडीकर. (छायाचित्र ः रुपेश हिराप)

सावंतवाडीत रंगपंचमी जल्लोषात
विविध रंगांची उधळण; अबालवृद्धांसह युवाईने धरला ठेका
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ ः सावंतवाडी शहराची पाच दिवसांची रंगपंचमी आज विविध रंगाची उधळण करत लहान-थोरांनी जल्लोषात साजरी केली. विशेषतः युवाईचा सहभाग रंगपंचमी खेळण्यात अतिव दिसून आला.
कोकणात होळी हा उत्सव विविध भागात आणि त्या त्या गावातील परंपरेनुसार आगळावेगळा असतो. शिवाय होळी उत्सवाचे दिवसही प्रत्येक गावाचे ठराविक असतात. सावंतवाडी शहरात होळी उत्सव पाच दिवसांचा असतो. पाचव्या दिवशी रंगपंचमी खेळून या सणाची सांगता होते. एकूणच रंगपंचमीच्या दिवसाची आतुरता शहरातील अबालवृद्धांसह युवाई वर्गाला लागलेली असते. आज पाचव्या दिवशी रंगपंचमी निमित्त शहरात एक प्रकारे जल्लोष दिसून आला. दुपारनंतर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात विविध रंगांनी रंगलेली बच्चे कंपनी रस्त्यावर तसेच गल्लीबोळात दिसून येत होते.
ठिकठिकाणी सोसायटीच्या ठिकाणीही एकत्रित येऊन तेथील नागरिक पाण्यासह रंगांची उधळण करत एकमेकांना गुलाल लावून रंगपंचमी साजरी करताना दिसून येत होते. युवाई वर्गामध्ये या रंगपंचमीची क्रेझ काहीशी औरच होती. शिवाय महिला वर्गांचा सहभागही तितकाच दिसून येत होता.
शहरात रस्त्यावर दुचाकीवर बसून रंगांची उधळणही काहींकडून करण्यात येत होती. त्यामुळे सकाळपासून शहरातील बाजारपेठ काहीशी उघडी ठेवण्यात आली होती, परंतु दुपारनंतर बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवून सर्वजण रंगपंचमीमध्ये न्हावून गेले होते. ढोल व अन्य वाद्यांच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी रंगपंचमीसह नृत्याचा ठेका धरतानाचे चित्र होते. सायंकाळी उशिरापर्यंत सर्वत्र हे चित्र पाहायला मिळत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com