पाटण घाटमार्गाबाबत सार्वजनिक अभियंत्यांना सूचना
पाटण घाटमार्गाबाबत अभियंत्यांना सूचना
येडगे यांच्या उपोषणाच्या इशाऱ्याची दखल; कार्यवाहीचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ६ : संगमेश्वर पाटण घाटमार्ग सर्वेक्षणाचे काम तातडीने सुरू न केल्यास १७ मार्चपासून मुंबईत बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संतोष येडगे यांनी दिला होता. या इशाऱ्याची दखल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांनी कार्यकारी अभियंता यांना याबद्दल कार्यवाही करून येडगे यांना उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान येडगे यांच्या इशाऱ्याची दखल मंत्रालय पातळीवरून देखील घेण्यात आली असून याबद्दल पत्र लिहून रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाला योग्य ती कार्यवाही करून त्याबद्दल शासनाला अवगत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संगमेश्वर-मुंबई-गोवा महामार्गापासून सुरु होणाऱ्या सातारा व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा संगमेश्वर-पाटण घाटमार्गाचा आराखडा तयार करण्याचे काम मोनार्च इंजीनीअरींग या कंपनीला देण्यात आले आहे. ८ जानेवारी २०२६ ला अपर मुख्य सचिव यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र अद्याप काम सुरू होत नसल्याने कामात दिरंगाई करणाऱ्या व्यवस्थेविरोधात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत समन्वयक संतोष येडगे यांनी १७ मार्चपासून मंत्रालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. या उपोषणाची दखल घेतली गेल्याने याबद्दल काहीतरी सकारात्मक कार्यवाही होईल, अशी आशा संतोष येडगे यांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

