संगमेश्वर खाडीपट्ट्यातील पहिली आंबा पेटी पुण्यात
संगमेश्वर खाडीपट्ट्यातील
पहिली आंबा पेटी पुण्यात
संगमेश्वर ः संगमेश्वर खाडीपट्ट्यातील यंदाच्या हंगामातील पहिली आंबा पेटी पुणे बाजारपेठेत रवाना झाली असून, हा मान परचुरी गावचे शरद गोणबरे आणि विपुल गोणबरे यांनी मिळवला आहे. ४ मार्च रोजी त्यांनी ही पहिली पेटी पुणे येथील प्रसिद्ध ‘लक्ष्मीनारायण’ व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी पाठविली. हवामानातील बदलांचे सावट असतानाही, मेहनतीच्या जोरावर गोणबरे बंधूंनी आंबा तयार करून तो बाजारपेठेत पोहोचवला आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातील इतर बागायतदारांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिली पेटी रवाना झाल्यानिमित्त गोणबरे बंधूंचे कृषी क्षेत्रातून आणि ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. खाडीपट्ट्यातील या पहिल्या आंबा पेटीच्या रवानगीमुळे आता लवकरच पुण्यासह इतर बाजारपेठांमध्येही कोकणचा हापूस मोठ्या प्रमाणावर दाखल होईल, अशी चिन्हे दिसत आहेत.
-------
ज्योती कॉन्व्हेन्टमध्ये
कुसुमाग्रजांच्या कविता
चिपळूण : तालुक्यातील वालोपे येथील ख्रिस्त ज्योती कॉन्व्हेन्ट हायस्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका सिस्टर डेलमा यांच्या हस्ते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या निमित्ताने पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. अदिती यादव हिने कुसुमाग्रज यांची प्रसिद्ध ‘कणा’ ही कविता प्रभावीपणे सादर केली. तसेच काही विद्यार्थ्यांनी नाटिका व नाट्यछटा सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. सूत्रसंचालन सिद्धी कालेकर आणि अक्षता गांधी यांनी केले.
-------
उन्हाच्या कडाक्यामुळे
कलिंगडला मागणी वाढली
संगमेश्वर ः मार्चच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचा कडाका वाढल्याने बाजारपेठेत थंड पेयांना जोरदार मागणी वाढली आहे. बाजारात विविध शीतपेयांची व फळांची रेलचेल वाढली आहे. बाजारपेठेत गावठी फ्रिज मोठ्याप्रमाणात विक्रीसाठी आले आहेत. शीतपेयांसह उसाचा रस, तसेच फळांची दुकाने वाढत आहेत. कलिंगडाची मागणी वाढत असून किलोला ४० रूपये दर मिळत आहे. उन्हापासून दिलासा मिळावा, यासाठी ग्राहक वर्ग शीतपेयांच्या दुकानांसमोर गर्दी करत आहेत.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

