कुडाळात सोमवारी ‘जागर स्त्री शक्तीचा’

कुडाळात सोमवारी ‘जागर स्त्री शक्तीचा’

Published on

29015

कुडाळात सोमवारी ‘जागर स्त्री शक्तीचा’

दीपलक्ष्मी पडते ः पाककला, खेळ पैठणीचासह विविध स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ७ ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कुडाळ येथे महिलांसाठी ‘जागर स्त्री शक्तीचा’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आमदार नीलेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि शिंदे शिवसेना महिला आघाडीतर्फे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा सोहळा सोमवारी (ता. ९) दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत कुडाळ पोस्ट ऑफिसजवळील श्री सिंधुदुर्गचा राजा मैदान येथे रंगणार आहे. विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, सन्मान सोहळा तसेच लकी ड्रॉ योजना आहे, अशी माहिती शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
येथील महायुती संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी पावशी जिल्हा परिषद सदस्य दादा साईल, नगरसेविका चांदणी कांबळी, नयना मांजरेकर, रेवती राणे, श्रुती वर्दम, राकेश कांदे, चेतन पडते, अभी गावडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्‍घाटन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते होणार असून आमदार नीलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असेल. तसेच शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर उपस्थित राहणार आहेत. महिला ढोल-ताशा पथकाचे सादरीकरण, पाककला स्पर्धा (खाद्यपदार्थ नाचणी, पाककलेची कृती लिहून आणणे आवश्यक), उखाणे स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा होईल. निमंत्रित ग्रुपचा नृत्याविष्कार सादर करण्यात येणार आहे. कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. ‘खेळ पैठणीचा’ होणार असून प्रथम क्रमांकाला पैठणी, द्वितीय क्रमांक सोन्याची नथ आणि तृतीय क्रमांकाला चांदीचा करंडा अशी बक्षिसे आहेत. हळदीकुंकू कार्यक्रम व उपस्थित महिलांना सौभाग्यवान भेट देण्यात येणार आहे. विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच शॉपिंग स्टॉल उभारण्यात येणार आहेत. लकी ड्रॉ असून घरगुती वस्तू बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत. पाककला स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी रेवती राणे, रेखा काणेकर तर उखाणा स्पर्धेसाठी चांदणी कांबळी व श्रुती वर्दम यांच्याकडे नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com