राजापूर-बेकायदेशीर नळजोडण्या, पंपाने पाणी चोरी

राजापूर-बेकायदेशीर नळजोडण्या, पंपाने पाणी चोरी

Published on

rat6p14.jpg
29020
राजापूरः सायबाच्या धरणामध्ये असलेला पाणीसाठा.
------------
बेकायदेशीर नळजोडण्यांवर कारवाईचा इशारा
राजापूर पालिका ॲक्शन मोडवर; दंडासह कायदेशीर कारवाई करणार
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ६ ः राजापूर नगरपालिका घरोघरी पाणीपुरवठा करत असली तरी काही लोकांकडून बेकायदेशीररित्या नळजोडण्या जोडून, तर काहीवेळा मुख्य जलवाहिनीला पंप बसवून पाणीचोरी केली जात आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यामध्ये व्यत्यय येत असल्याचे नगरपालिका प्रशासनाच्या लक्षात आले. अशा पाणी चोरीचे सर्व्हेक्षण करून त्यांच्यावर थेट दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे यांनी दिल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून हवेतील उष्मा कमालीचा वाढला आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम जलसाठ्यावर होवून पाणीटंचाईची झळा पोहचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोदवली येथील सायबाच्या धरणामध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे. तरीही पाणीटंचाई लक्षात घेवून सायबाच्या धरणाच्या वरच्या बाजूला आणि गोडे नदीपात्रामध्ये ठिकठिकाणी बंधारे बांधले आहेत. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाईची झळ मोठ्या प्रमाणात भासणार नाही, असा विश्‍वास खडपे यांनी व्यक्त केला आहे.
शहरामध्ये जलवाहिन्यांद्वारे करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी पालिकेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अवैधरित्या होणाऱ्या पाणीचोरीमुळे पालिकेचा कररूपी महसूल बुडत आहे. तसेच पाणी पुरवठाही विस्कळित होत आहे. त्यामुळे पाणीचोरी करणाऱ्यांवर थेट दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे खडपे यांनी सांगितले.

चौकट
पाणीपट्टी न भरल्यास जोडणी तोडणार
नगर पालिकेच्या हक्काच्या उत्पन्नाचा स्त्रोत असलेल्या विविध करांची वसुली करण्याचे काम पालिका प्रशासनातर्फे केले जात आहे. त्यामध्ये पाणीपट्टी वसुलीचाही समावेश असून पाणीपट्टीसह अन्य करवसुली सध्या अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. नळसंयोजनधारकांनी वेळेमध्ये पाणीपट्टी भरणा करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे यांनी केले आहे. पाणीपट्टी भरल्यास नळजोडणी तोडण्यात येईल, असेही खडपे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com