

-rat६p१५.jpg-
P२६O२९०२१
पावस ः गौतमी नदीवरील नव्या पुलाचे काम वेगाने सुरू आहे.
(छाया ः आदित्य भट, पावस)
----
गौतमी नदीवरील पुलाचे काम गतीने
सागरी महामार्ग ; पावसाळ्यापूर्वी पूर्ततेची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ६ ः रत्नागिरी ते नाटे या सागरी मार्गावरील पावस येथील गौतमी नदीवरील पुलाचे काम प्रगतिपथावर असून मे महिनाअखेर काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
रेड्डी ते रेवस या सागरी महामार्गाचे काम प्रस्तावित असून त्यासाठी अनेक ठिकाणी या मार्गावरील रस्त्याच्या व पुलांच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या सागरी मार्गावरील पावस येथील गौतमी नदीवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन दोन महिन्यांपूर्वी झाले होते. त्यानंतर कामाला सुरुवात झाली आहे. सध्या पिलरचे काम सुरू असून महिनाभरात पिलरचे काम पूर्णत्वाला जाऊन त्यानंतर गर्डरचे चढविण्याचे काम सुरू होईल. पावसाळ्यापूर्वी या पुलाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. नवीन होणाऱ्या पुलासाठी साडेआठ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.