महिला बचतगट विक्री केंद्राचे आज उद्घाटन
महिला बचतगट विक्री
केंद्राचे आज उद्घाटन
रत्नागिरी : महिला व बालविकास विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यावतीने शहरातील आठवडा बाजार येथे महिला बचतगट विक्री केंद्र तसेच महिला बचत गट भवनाचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत उद्या शनिवार ७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. यावेळी खासदार नारायण राणे, खासदार सुनिल तटकरे, विधान परिषद आमदार ॲङ निरंजन डावखरे, विधान परिषद आमदार प्रसाद लाड, विधान परिषद आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर हे सन्माननीय अतिथी उपस्थित राहणार आहेत. तरी नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनोज पाटणकर व वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी संजय गर्जे यांनी केले आहे.
------
नागरी संरक्षण दलाच्या
नुतनीकरण कार्यालयाचे
रत्नागिरी : गृह विभाग (विशेष) विभागाच्या नागरी संरक्षण दलाच्या नूतनीकरण कार्यालयाचे उद्घाटन उद्योग, पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते उद्या शनिवार (ता. ७ ) दुपारी १२ वाजता होणार आहे. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील, मिलिंद कुलकर्णी, अमोल ओटवणेकर, जनक धोत्रेकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. संबंधितांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल व उपनियंत्रक नागरी संरक्षण दल ले. कर्नल प्रशांत चतुर (नि.) यांनी केले आहे.
-----
मिनी थिएटरचे
आज उद्घाटन
रत्नागिरी : रत्नागिरीच्या सांस्कृतिक आणि कला विश्वासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. शहराची वाढती सांस्कृतिक गरज लक्षात घेऊन आणि स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नागिरीत एक सुसज्ज मिनी थिएटर उभारलेले आहे. या मिनी थिएटरचे उद्या (ता. ७) सायंकाळी ६ वाजता अरिहंत मॉल येथील मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी संस्कृत उपकेंद्र येथे उद्घाटन होणार आहे. या नव्या नाट्यगृहामुळे रत्नागिरीची सांस्कृतिक चळवळ अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे. या मिनी थिएटरची एकूण आसन क्षमता ३०० असून लघु नाट्यछटा, कार्यक्रम, स्नेहसंमेलने यांसारख्या कार्यक्रमांसाठी हे मिनी थिएटर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याला कला व संस्कृतीची दीर्घ परंपरा लाभलेली आहे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे याला अधिक मोठे स्वरूप प्राप्त होणार आहे. त्यामुळे या मिनी थिएटरच्या उद्घाटन कार्यक्रमात स्थानिक रत्नागिरीकर, कलाकार, रंगकर्मींनी आवर्जून उपस्थित रहावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

