‘बालविवाह मुक्ती’साठी
रथयात्रेद्वारे जनजागृती

‘बालविवाह मुक्ती’साठी रथयात्रेद्वारे जनजागृती

Published on

29027

‘बालविवाह मुक्ती’साठी
रथयात्रेद्वारे जनजागृती
रत्नागिरी, ता. ६ : महिला व बाल विकास विभागामार्फत बालविवाह मुक्तीकरिता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व महात्मा फुले मंडळ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने काल (ता. ५) धनजी नाका बाजारपेठ गाडीतळ बस स्टँड रेल्वे स्टेशन इथपर्यंत रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनोज पाटणकर, जिल्हा परिविक्षा अधिकारी अतीश शिंदे व अनिल माळी, संरक्षण अधिकारी (जिल्हास्तर) दीपाली चांदबोधले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समृद्धी वीर, महात्मा फुले मंडळ सोलापूर या संस्थेच्या जिल्हा समन्वयक प्रेरणा सुर्वे, मुख्य सेविका कल्पना आंबवले, चाईल्ड हेल्पलाईन प्रकल्प समन्वयक अन्वी शिंदे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन कक्ष, सखी वन स्टॉप सेंटर मधील सर्व अधिकारी, कर्मचारी व महात्मा फुले मंडळ, सोलापूर या संस्थेचे सदस्य साळवी कार्यक्रमास उपस्थित होते.
या रथयात्रेची सुरुवात करण्यापूर्वी बाल विवाह रोखण्याबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. बालविवाह रोखा, मुलांचे भविष्य घडवा, शिक्षण हाच खरा अधिकार असा संदेश या रथ यात्रेद्वारे देण्यात आला. बालविवाहासंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास १०९८ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com