सिंधुदुर्गनगरीत उद्या ''अस्मिता लीग''
swt619.jpg
29039
सिंधुदुर्गनगरी ः ‘अस्मिता लीग’ क्रीडा स्पर्धेची माहिती देताना नीलिमा अडसूळ, अपेक्षा मांजरेकर.
सिंधुदुर्गनगरीत उद्या ‘अस्मिता लीग’
नीलिमा अडसूळ ः मुली, महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ६ ः सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा विभाग व मेरा युवा भारत सिंधुदुर्गच्यावतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रविवारी (ता. ८) सिंधुदुर्गनगरी येथे ‘अस्मिता लीग’ क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील मुली व महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी आज पत्रकार परिषदेतून केले.
या उपक्रमांतर्गत देशभर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. सिंधुदुर्ग क्रीडा संकुल येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये १०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे अशा स्पर्धा होणार आहेत. तीन गटांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी १३ वर्षांखालील तसेच १३ ते १८ वर्षे वयोगट व १८ वर्षांवरील वयोगटातील सर्व महिलांना सहभाग घेता येणार आहे. या स्पर्धा सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार असून स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विजेत्या स्पर्धकांना सन्मानित करण्यात येणार आहे.
सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार असून प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्या स्पर्धकांना पदके दिली जाणार आहेत. या स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी अस्मिता पोर्टल अथवा प्रत्यक्ष उपस्थित राहून नोंदणी करावी. सहभागी खेळाडूंनी आधार कार्ड किंवा जन्मतारीख दर्शविणारा शासकीय पुरावा सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये तसेच महिला, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अडसूळ व अपेक्षा मांजरेकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

