खांबाळेत वणवा लागून हानी

खांबाळेत वणवा लागून हानी

Published on

29042

खांबाळेत वणवा लागून हानी

काजू कलमे जळाली; प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ६ : खांबाळे (ता.वैभववाडी) येथील गांगोचा माळ परिसरात लागलेल्या वणव्यात अंजनी केगडे यांची १०२ काजू कलमे जळून खाक झाली. बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेऊन आग अटोक्यात आणल्यामुळे अनर्थ टळला.
जिल्ह्याच्या अनेक भागांत सध्या वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी बांदा परिसरात लागलेल्या आगीत आंबा आणि काजू कलमे जळाली होती. त्यानंतर बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास वैभववाडी तालुक्यातील खांबाळे येथील गांगोचा माळ परिसराला आग लागली. माळरानावरील सुकलेले गवत आणि सोसाट्याचा वारा यामुळे आगीचा भडका उडाला. अवघ्या काही मिनिटांत आग संपूर्ण माळरानावर पसरली.
दुपारची वेळ असल्याने माळरानावरील आग लागल्याचे समजण्यास विलंब झाला. परिणामी आगीने अंजनी केगडे यांची काजू बाग व्यापली. वाऱ्यामुळे बघता बघता संपूर्ण बाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यामध्ये केगडे यांची १०२ काजू कलमे पूर्णतः जळाली असून, त्यांचे सुमारे दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
----
बागे भोवती ‘आगरेषा’ आखा!
या माळरानावर मोठ्या प्रमाणात काजू लागवड आहे. या बागेतून आग अन्य भागातही पसरत होती; मात्र माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये बंडू गुरव, लवू पवार, संकेत पवार, छोटू गुरव, मनोज पवार, प्रकाश पवार, समीर पवार, गणेश पवार, गोठ्या साळुंखे यांनी फवारणी पंपाच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविले. त्यांच्या सतर्कतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला. दरम्यान, बागेतील सुकलेले गवत काढून घ्यावे आणि बागेच्या भोवती ‘आगरेषा’ आखावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com