एलईडीने मासेमारी करणारी नौका पकडली
एलईडीने मासेमारी करणारी नौका ताब्यात
मिरकरवाडा समुद्रात कारवाई ; मत्स्य व्यवसाय विभागाकडून चौकशी सुरू
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : मिरकरवाडा समुद्रात एलईडी प्रकाशातील बेकायदेशीर मासेमारी सीमाशुल्क विभागाच्या गस्ती पथकाने उघडकीस आणली. एलईडी लाईट लावून समुद्रात मासेमारीसाठी जात असणाऱ्या ‘वन स्टार’ नावाची मच्छीमार नौका गस्ती पथकाने पकडून सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या ताब्यात दिली. ही नौका भगवती बंदर येथे ठेवण्यात आली आहे.
जानेवारी महिन्यापासून यांत्रिकी मासेमारी नौकांना सुधारित सागरी मासेमारी अधिनियमानुसार साडेबारा नॉटीकल मैलच्या बाहेर समुद्रात मासेमारी करता येते. राज्याच्या समुद्र क्षेत्रात म्हणजेच साडेबारा नॉटीकल मैलच्या आत मासेमारी करण्यास बंदी आहे. अशावेळी सीमाशुल्क विभागाने पाच ते सहा नॉटीकल मैलच्या आत ही ‘वन स्टार नौका’ पकडली आहे. सीमाशुल्क विभाग किंवा कस्टमची गस्ती नौका सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास गस्तीसाठी जात असताना त्यांना ‘वन स्टार’ ही नौका एलईडी लाईट लावून जात असताना दिसून आली. या गस्ती पथकाने ही नौका पकडून मिरकरवाडा बंदरात आणून सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभाग अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली. ही नौका भगवती बंदरात ठेवण्यात आली आहे. वन स्टार ही नौका अनिस नाखवा यांच्या मालकीची असल्याचेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यानंतरच दोषींवर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
---
द्वंद्व थांबविण्यासाठी कारवाईची गरज
बेकायदेशीर एलईडी मासेमारीवर नियंत्रण राहावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भातील कारवाईकडे दुर्लक्ष झाले तर पारंपरिक आणि पर्ससीन नेट मच्छीमारांचे पुन्हा द्वंद्व सुरू होण्याची भीती आहे. त्यामुळे एलईडी विरुद्ध पुन्हा प्रशासन आणि मत्स्य विभाग सक्रिय होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

