शिरगाव येथे आज ''महाराजस्व'' शिबिर

शिरगाव येथे आज ''महाराजस्व'' शिबिर

Published on

शिरगाव येथे आज
‘महाराजस्व’ शिबिर
देवगडः तालुक्यातील शिरगाव महसूल मंडळात उद्या (ता. ७) सकाळी ९ वाजता होणाऱ्या एकदिवशीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात परिसरातील नागरिकांनी विविध सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन येथील तहसीलदार रमेश पवार यांनी केले आहे. शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा -क्र.१ अंतर्गत तालुक्यातील शिरगाव महसूल मंडळात उद्या (ता. ७) सकाळी ९ वाजता एक दिवसीय समाधान शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरात राज्याच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध लाभाच्या योजना लाभार्थ्यांना थेट देण्याकरिता तालुक्यातील शासनाची विविध कार्यालये सहभागी होणार आहेत. या शिबिरात संजय गांधी योजना अर्ज स्वीकारणे, वितरण करणे, माहिती देणे, सेतू विभागाच्या सुविधा, महा ई-सेवा केंद्रामार्फतचे दाखले, पुरवठा शाखा विषयक कामकाज करणे, निवडणूक ओळखपत्र, अ‍ॅग्रीस्टॅक आधार कार्ड, पंचायत समिती संबधित योजना, कृषि विभाग संबधित योजना तसेच कृषी विभाग, पंचायत समिती व भूमिअभिलेख कार्यालयाशी संबंधित कामकाज, आरोग्य विषयक सुविधा आदी सुविधांचा लाभ दिला जाणार आहे. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार पवार यांनी केले आहे.
......................
दाभोळे ग्रामपंचायतीत
उद्या महिला दिन
देवगड ः दाभोळे येथील प्रगती एज्युकेशनल गायडन्स असोसिएशन आणि ए. जे. वाचनालय यांच्यावतीने रविवारी (ता. ८) दुपारी ३ वाजता दाभोळे ग्रामपंचायतीमध्ये जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. यामध्ये ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश पाटोदेकर यांचे ‘महिला सक्षमीकरणात आरोग्याचे महत्व’ आणि प्रदीप कदम यांचे ‘महिला सक्षमीकरणात भारतीय संविधानाची भूमिका’ या विषयी मार्गदर्शन होणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या स्नेहा अनभवणे आणि दाभोळे बौध्दवाडी अंगणवाडीच्या सेविका रुपा चव्हाण, मदतनीस सुनिता अनभवणे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सरपंच श्रीकृष्ण अनभवणे, उपसरपंच प्राची बर्वे, ग्रामविकास अधिकारी पांडुरंग शेटगे, ग्राम महसूल अधिकारी संदीप सरवदे, केंद्रप्रमुख प्रणाली मराठे आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा सानिका कदम यांनी दिली.
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com