कोकणातील शिमगोत्सवाची ओडिसामध्ये धुम

कोकणातील शिमगोत्सवाची ओडिसामध्ये धुम

Published on

rat६p२५.jpg-
P२६O२९०५७
रत्नागिरी : ओडिशामध्ये सजवण्यात आलेली भैरीबुवाची पालखी
----
कोकणातील शिमगोत्सवाची ओडिशामध्ये धूम
रत्नागिरी तरुणांनी पालखी सजवून साजरा केला उत्सव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : कोकण म्हटले की शिमगा आणि गणेशोत्सव या सणांचा एक वेगळाच उत्साह असतो. जगाच्या पाठीवर कोकणातील माणूस कोठेही गेला, तरी या दोन सणांपासून तो लांब राहू शकत नाही. नोकरी-व्यवसायानिमित्त रत्नागिरीतील काही तरुण ओडिशात वास्तव्याला आहेत. शिमगोत्सवात कोकणात घरी येण्यासाठी सुटी नसल्याने, त्या तरुणांनी पालखी सजवून त्यात श्रीदेव भैरीबुवांचा फोटो स्थापन केला आणि शिमगोत्सवाचा आनंद लुटला.
रत्नागिरीतील प्रसिद्ध गद्रे कंपनीची शाखा ओडिशा राज्यातील बालासोर येथे असून, या ठिकाणी रत्नागिरीतील अनेक तरुण कार्यरत आहेत. शिमगोत्सवानिमित्त कंपनीतून गावी येणे शक्य नसल्याने, येथील तरुणांनी ओडिशातील बालासोर येथे वास्तव्यास असलेल्या ठिकाणीच पालखी तयार केली. या पालखीमध्ये रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरीबुवांच्या छायाचित्राची स्थापना केली. पालखीची विधिवत पूजा करून होळी, धुलिवंदन आदी सण शिमगोत्सवानिमित्त साजरे केले. ढोल-ताशांच्या गजरात पालखी नाचवण्याचा आनंदही या तरुणांनी लुटला.
हा उत्सव साजरा करण्यामध्ये विजेंद्र गाडेकर, सचिन सुर्वे, श्रीकृष्ण चव्हाण, विजय चव्हाण, नीलेश सावंतदेसाई, विजय पालकर, वैभव नागवेकर, दिनेश कदम, संतोष घवाळी, प्रशांत साळवी, वीरेंद्र कोरगावकर, स्वप्नील अवसरे, मृणाल पालकर, किरण जाधव, संजय पवार यांच्यासह ओडिशामध्ये कार्यरत असणाऱ्या अन्य रत्नागिरीकर तरुणांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com