कापड व्यावसायिकांतर्फे उद्या
''कुडाळ साडी वॉकेथॉन २०२६''

कापड व्यावसायिकांतर्फे उद्या ''कुडाळ साडी वॉकेथॉन २०२६''

Published on

कापड व्यावसायिकांतर्फे उद्या
‘कुडाळ साडी वॉकेथॉन २०२६’

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी कुडाळ शहरातील स्थानिक कापड व्यावसायिकांच्यावतीने रविवारी (ता. ८) येथे ‘कुडाळ साडी वॉकेथॉन २०२६’चे आयोजन केले आहे. हा उपक्रम केवळ महिलांसाठी असून तो दोन गटांत होणार आहे. यात महिलांना साडी परिधान करून सहभागी होता येणार आहे. सकाळी ७ वाजता (रिपोटींग टाईम ६.३० वा.) येथील महालक्ष्मी सभागृहाकडून या वॉकेथॉनला प्रारंभ होणार आहे.
दीड किलोमीटर व तीन किलोमीटर अशा दोन गटांत ही वॉकेथॉन होणार आहे. दीड किलोमीटरचा मार्ग महालक्ष्मी सभागृह-भैरव मंदिर-बस स्थानक- बाजारपेठ वर्दम तिठा-पान बाजार व पुन्हा महालक्ष्मी सभागृह असा राहणार आहे, तर तीन किलोमीटर वाकेथॉनचा मार्ग महालक्ष्मी सभागृह-भैरव मंदिर बस स्थानक-नक्षत्र टॉवर-जिजामाता चौक-पोस्ट कार्यालय पोलिस ठाणे- छत्रपती संभाजी महाराज चौक व तेथून पुन्हा पोलिस ठाणे-जिजामाता चौक- नक्षत्र टॉवर बस स्थानक बाजारपेठ वर्दम तिठा- पानबाजार व तेथून महालक्ष्मी सभागृह असा राहील. सहभागी महिलांना ‘सरप्राईज कुपन’, अल्पोपहाराची व्यवस्था आहे. कोणत्याही वयोगटातील महिला यात सहभागी होऊ शकतात. लक्षवेधी साडी परिधान करणाऱ्या महिलांमधून प्रथम तीन क्रमांकाच्या महिलांना साडी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. आतापर्यंत २०० महिलांनी यात सहभाग दर्शविला आहे. जास्तीत जास्त महिलांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com