कुडाळात ठाकरे शिवसेनेतर्फे
छत्रपती शिवरायांना वंदन

कुडाळात ठाकरे शिवसेनेतर्फे छत्रपती शिवरायांना वंदन

Published on

29063

कुडाळात ठाकरे शिवसेनेतर्फे
छत्रपती शिवरायांना वंदन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ७ ः तालुका ठाकरे शिवसेनेच्यावतीने येथील शिवसेना शाखेत आज मोठ्या उत्साहात तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष करत छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून महाराजांना अभिवादन केले. याप्रसंगी ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे, तालुका संघटक सचिन कदम, उपतालुका प्रमुख बाळा कोरगावकर, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, पंचायत समिती सदस्य योगेश धुरी, बाळा कांदळकर, शहरप्रमुख संतोष शिरसाट, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष अतुल बंगे, उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकर, कुंदे सरपंच रुपेश तायशेटे, शाखा प्रमुख वीरेश परब, युवासेना शहर समन्वयक अमित राणे, गौरीशंकर कदम, नंदू आंबेरकर, विनय पालकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com