खासगी आराम बस उलटून २५ प्रवासी जखमी
२९०७५
आराम बस उलटून
२५ प्रवासी जखमी
ऐनवरेजवळ अपघात; शिमगोत्सवासाठी मुंबईतून येत होते गावी
खेड, ता. ६ : तालुक्यात शिमगोत्सवासाठी गावाकडे येणाऱ्या भाविकांची बस ऐनवरे येथे पहाटेच्या सुमारास उलटली. बोरिवलीहून सापिर्ली या गावाकडे येणारी खासगी आराम बस उलटल्याने २५ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोघे गंभीर जखमी आहेत. सर्व जखमींवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बोरिवली येथून सापिर्ली व धामणंद परिसरातील भाविक शिमगोत्सव आणि ग्रामदेवतेच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आपल्या गावी येत होते. आरामबस गुरुवारी (ता. ५) रात्री बोरिवलीहून निघाली होती. पहाटे सुमारे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बस खेड-धामणंद मार्गावरील ऐनवरे येथे पोहोचली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटली. या बसमध्ये एकूण २८ प्रवासी प्रवास करत होते. बस उलटल्याने प्रवाशांनी आरडाओड केली. आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी धाव प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली. बसची समोरील काच फोडून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

