जिल्हा परिषदेच्या भाजप 
गटनेतेपदी संजय बोबडी

जिल्हा परिषदेच्या भाजप गटनेतेपदी संजय बोबडी

Published on

29082

जिल्हा परिषदेच्या भाजप
गटनेतेपदी संजय बोबडी

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ६ ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजप गटनेतेपदासाठी गुरुवारी झालेल्या बैठकीत संजय बोबडी यांची निवड करण्यात आली. या बैठकीला भाजपचे सर्व २७ जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया झाली. यानंतर गट स्थापनेचे पत्र उपजिल्हाधिकारी आरती देसाई यांना दिले.
जिल्हा परिषदेत कमळ चिन्हावर निवडून आलेल्या २७ सदस्यांचा भाजपा गट स्थापन करण्यात आला. त्यामध्ये प्रमोद रावराणे, श्रावणी रावराणे, रिद्धी सुतार, प्राची इस्वलकर, संतोष पारकर, मनोज रावराणे, सुप्रिया मेस्त्री, शीतल दळवी, संदेश सावंत, संजय बोबडी, सुयोगी घाडी, अवनी तेली, अनुराधा नारकर, देवदत्त कदम, सावी लोके, सुनील पारकर, क्षमा हडकर, सुप्रिया वालावलकर, आरती पाटील, प्रीतेश राऊळ, शोभा गावडे, संदीप गावडे, विक्रांत सावंत, अर्पणा सातोस्कर, प्रमोद कामत, श्वेता धर्णे, रामा गवस यांचा समावेश आहे. गटाची स्थापना झाल्यानंतर गटनेते बोबडी यांनी उपजिल्हाधिकारी देसाई यांची भेट घेऊन निवडीबाबतचे पत्र सादर केले. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड १६ मार्चला होणार असून सत्ताधारी गटाचे गटनेते म्हणून श्री. बोबडी पुढील कामकाज पाहणार आहेत. त्यांच्या निवडीबद्दल प्रभाकर सावंत, मनीष दळवी तसेच पक्षाच्या सदस्यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com