करंजाणीत तरुणाचे अपहरण करून मारहाण

करंजाणीत तरुणाचे अपहरण करून मारहाण

Published on

तरुणाचे अपहरण करून मारहाण
करंजाणीतील प्रकार; चौघांवर गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ७ : तालुक्यातील करंजाणी येथे बसस्टॉपवर एका युवकाला पैशाच्या देवघेवीवरून जबरदस्तीने मोटारीत बसवून अपहरण करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गौराबाई बसवराज पवार (वय ५०, रा. करंजाणी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा किरण बसवराज पवार (वय ३०) याचे संशयितांनी अपहरण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ५ फेब्रुवारी २०२६ ला दुपारी करंजाणी बसथांब्यावर किरण पवार उभा असताना संशयित शब्बीर मांडलेकर(वय ६०) व त्याच्या सोबत जिशान शब्बीर मांडलेकर (२८), सुबान शब्बीर मांडलेकर (२१) आणि सरजीन लियाकत मांडलेकर ( सर्व रा. म्हाप्रळ, ता. मंडणगड) आणि अन्य तिघेजण तिथे आले. त्यांनी तू पैसे दिले नाहीस तर तुला मारून टाकू, अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांनी किरण पवार याला जबरदस्तीने मोटारीतून बसवून पैशांची मागणी करून मारहाण केली. तसेच त्याला म्हाप्रळ येथे घरी नेऊन ठेवले. याबाबत किरणच्या आईने पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी म्हाप्रळ येथे जाऊन त्याची सुटका केली. तसेच चार संशयितांनाही अटक करून गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com