कुडाळ इनरव्हील क्लबतर्फे महिला दिनी उपक्रम
29236
कुडाळ इनरव्हील क्लबतर्फे
‘सक्षम स्त्री, सक्षम भारत’
कुडाळ, ता. ७ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, इनरव्हील डिस्ट्रिक्ट-३१७ च्या चेअरमन उत्कर्षा पाटील यांच्या ‘सक्षम स्त्री, सक्षम भारत’ या उपक्रमांतर्गत येथील इनरव्हील क्लबतर्फे एका गरजवंत महिलेला इस्त्रीचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ. सायली प्रभू यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी अध्यक्षा सानिका मदने यांनी ‘सक्षम स्त्री, सक्षम भारत’ ही संकल्पना ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी क्लब कटिबद्ध असल्याचे सांगितले. डॉ. प्रभू यांनी कुडाळ इनरव्हील क्लबच्या २०२५-२६ या वर्षातील कामगिरीचे कौतुक केले. डिस्ट्रिक्ट ३१७ मध्ये क्लबने स्थान अधिक भक्कम केल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकल्पासाठी खजिनदार गीतांजली कांदळगावकर यांनी योगदान दिले, तर चित्रा बोभाटे यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी क्लबच्या अध्यक्षा सौ. मदने यांच्यासह संजना काणेकर, चित्रा बोभाटे, अनघा केसरकर, ऋतुजा परब, स्वप्नाली साळगावकर, शरयु अंधारी, पल्लवी बोभाटे, आरोही माने, राजश्री सावंत, डॉ. उज्ज्वला सावंत, जान्हवी रावराणे आदी इनरव्हील सदस्या उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

