‘फ्रेंडशिप चेंदवण’ उपांत्य फेरीत

‘फ्रेंडशिप चेंदवण’ उपांत्य फेरीत

Published on

29237

‘फ्रेंडशिप चेंदवण’ उपांत्य फेरीत

कुडाळातील क्रिकेट स्पर्धा; आज होणार अंतिम सामना

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ७ : येथील जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर प्रिन्स समादेवी मित्र मंडळ व कलेश्वर मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराज्य डे-नाईट क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी फ्रेंडशिप चेंदवण संघाने दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेला माजी आमदार वैभव नाईक तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित बिल्डर विजय प्रभू यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी सुनील धुरी व अन्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
दिवसभरातील पहिला सामना रामेश्वर घावनळे विरुद्ध ऑल स्टार कुडाळ असा झाला. रामेश्वर संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि ऑल स्टार कुडाळला ६ षटकांत ३५ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात योगेश बालम याने ८ चेंडूत १८ धावा काढल्या आणि रामेश्वर घावनळे संघाला विजय मिळवून दिला. योगेशला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरविले.
दुसरा सामना फ्रेंडशिप चेंदवण विरुद्ध लाईम लाईटमध्ये झाला. फ्रेंडशिप संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करत लाईम लाईटला ३१ धावांवर रोखले. दर्शन बांदेकरच्या ५ चेंडूतील १५ धावांच्या बळावर फ्रेंडशिप संघाने ३२ धावांचे लक्ष्य सहज पार केले. दर्शन बांदेकर ‘सामनावीर’ ठरला.
तिसरा सामना फ्रेंडशिप चेंदवण विरुद्ध रामेश्वर घावनळे असा होता. रामेश्वर संघाने अचूक गोलंदाजी करत बलाढ्य फ्रेंडशिप संघाचे ९ गडी बाद करून त्यांना ३२ धावांत रोखले. समीर पिळणकर व सागर पांगम यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले; मात्र, ३३ धावांचा बचाव करताना फ्रेंडशिपच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला आणि विजय खेचून आणला. सोहेल शेख ‘सामनावीर’ ठरला.
चौथा सामना लाईम लाईट विरुद्ध ऑल स्टार कुडाळ असा झाला. प्रथम फलंदाजी करताना ऑल स्टार कुडाळने २६ धावा केल्या. २७ धावांचे आव्हान लाईम लाईटने सहज पूर्ण केले. श्रीकांत गावकर ‘सामनावीर’ ठरला. पाचवा सामना लाईम लाईट कुडाळ विरुद्ध रामेश्वर घावनळे असा होता. प्रथम फलंदाजी करताना लाईम लाईटने ५७ धावांचा डोंगर उभा केला. ५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रामेश्वर संघाची दमछाक झाली. जॉनी फर्नांडिस ‘सामनावीर’ ठरला.
-------
महाअंतिम सामन्याकडे लक्ष
उप-उपांत्य फेरीचा सामना फ्रेंडशिप चेंदवण विरुद्ध लाईम लाईट कुडाळ असा होता. फ्रेंडशिप संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करताना लाईम लाईटला २८ धावांवर रोखले आणि २९ धावांचे लक्ष्य सहज पार केले. सूर्या गावकर ‘सामनावीर’ ठरला. आतापर्यंत गोवन स्ट्रायकर्स (गोवा), धाडसकळ (गोवा) आणि फ्रेंडशिप चेंदवण या तीन संघांनी उपांत्य फेरीत आपली जागा निश्चित केली आहे. शनिवारी चौथा संघ निश्चित होणार असून, स्पर्धेचा महाअंतिम सोहळा उद्या (ता. ८) होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com