आसोलीच्या मुख्याध्यापिका रायशिरोडकर यांचा सत्कार
29238
आसोलीच्या मुख्याध्यापिका
रायशिरोडकर यांचा सत्कार
बांदा, ता. ७ : आसोली येथील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक श्री नारायण विद्यामंदिर, आसोली क्र. १च्या मुख्याध्यापिका वैभवी वसंत रायशिरोडकर यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल सावंतवाडी येथे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सावंतवाडी येथील राजवाड्यात ‘राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र, सिंधुदुर्ग’ यांच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा सन्मान झाला. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रांतील आदर्श व्यक्तींना गौरविण्यात आले.
रायशिरोडकर यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविणे, गुणवत्ता वाढ, डिजिटल शिक्षणाचा वापर, तसेच सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांना दिलेले प्रोत्साहन यांचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी स्वच्छता अभियान, पर्यावरण जनजागृती, वाचन प्रेरणा आणि ‘आठवडी बाजार’ यांसारखे उपक्रम राबवून लोकसहभागातून शाळेच्या प्रगतीत मोठा हातभार लावला.
या पुरस्कारामुळे आसोली गाव, वेंगुर्ला तालुका व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ‘‘हा पुरस्कार केवळ माझा नसून, तो संपूर्ण शाळा परिवाराच्या कष्टाचे फळ आहे,’’ अशा भावना रायशिरोडकर यांनी व्यक्त केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

