कोल्हापूरच्या खेळाडूंचा अचूक नेम

कोल्हापूरच्या खेळाडूंचा अचूक नेम

Published on

- rat७p२.jpg-
२६O२९२१७
डेरवण ः येथील राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेतील एक क्षण.

नेमबाजीत कोल्हापूरचे वर्चस्व
डेरवण यूथ गेम्स ; पदकांची लयलूट
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ : विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित डेरवण यूथ गेम्समध्ये पार पडलेल्या नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या खेळाडूंनी अचूक नेम साधत आपले वर्चस्व सिद्ध केले. कोल्हापूरच्या तब्बल २१ नेमबाजांनी विविध गटांत पदके पटकावली, तर सोलापूरच्या नेमबाजांनी १० पदकांसह दुसरे स्थान पटकावले. दुसरीकडे, तिरंदाजी स्पर्धेत साताऱ्याच्या खेळाडूंनी २२ पदके जिंकून मैदानावर आपला ठसा उमटवला.
नेमबाजी स्पर्धा १४ आणि १७ वर्षांखालील मुले-मुलींच्या गटात पार पडली. यात पीपसाइट रायफल, ओपनसाइट रायफल आणि एअर पिस्तूल अशा तीन प्रकारांत राज्यभरातून १४८ नेमबाज सहभागी झाले होते. १४ वर्षांखालील मुलांच्या एअर पिस्तूलमध्ये अर्णव वाघारेने सुवर्णपदक पटकावले. मुलींच्या गटात आराध्या कांबळे (एअर पिस्तूल), आयुषी शिंदे (पीपसाइट) आणि इच्छा गायकवाड (ओपनसाइट) यांनी सुवर्णपदकावर नाव कोरले. तसेच ऋग्वेद खोत (१४ वर्षे) आणि अथर्व सुतार (१७ वर्षे) यांनी ओपनसाइट प्रकारात सुवर्ण यश मिळवले. सोलापूरच्या यशराज गुजरे (१४ वर्षे, एअर पिस्तूल) आणि स्वरा कलधोणे (१७ वर्षे, एअर पिस्तूल) यांनी सुवर्णपदके मिळवली. वैष्णवी गुजरेने रौप्यपदक पटकावले. मुंबईच्या निधी हडकर, अनेस्का पालांडे आणि इशान नाडर यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकांची कमाई केली.
-----
तिरंदाजीत साताऱ्याचा झेंडा
तिरंदाजी स्पर्धेत साताऱ्याच्या २२ खेळाडूंनी पदके जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व राखले. पुण्याच्या १० खेळाडूंनीही चमकदार कामगिरी केली. १० वर्षांखालील गटात ठाण्याच्या स्वरूप कासेकरने (कम्पाऊंड) आणि शरयू सैतवडेकरने (रिकर्व्ह) सुवर्णपदक जिंकले. इंडियन फेरीत १० वर्षांखालील गटात समर्थ सूर्यवंशी आणि आराध्या शिंदे, तर १८ वर्षांखालील गटात समर्थ थोपटे आणि राशी गर्दे यांनी सुवर्णपदके पटकावली. १८ वर्षांखालील मुलींच्या कम्पाऊंड फेरीतील तिन्ही पदके पुण्याच्या समृद्धी तौर, अनुष्का पवार आणि अभिद्या गावडे यांनी पटकावली. सांगलीच्या ज्योती सावंत, अफरीन पठाण आणि विराज पवार यांनीही पदकविजेत्यांच्या यादीत स्थान मिळवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com