रत्नागिरीतील विद्यार्थी खगोल दर्शनाने भारावले
- rat७p६.jpg-
२६O२९२२८
रत्नागिरी ः ‘जायंट्स ग्रुप’तर्फे आयोजित उपक्रमात रत्नागिरीतील ठाकरे तारांगण येथे आयोजित कार्यक्रमात अवकाशातील अद्भुत विश्वाचा अनुभव घेताना विद्यार्थी आणि नागरीक.
----
तारांगणात खगोलविश्वाचा रोमांचक प्रवास
‘जायंट्स ग्रुप’तर्फे आयोजन ; रत्नागिरीत विज्ञान दिन उत्साहात, विद्यार्थ्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून ‘जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरी’च्या वतीने स्थानिक श्रीमान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत खगोल प्रेमी आणि विद्यार्थ्यांनी अवकाशातील अद्भुत विश्वाचा अनुभव घेतला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून खगोल अभ्यासक प्रा. बाबासाहेब सुतार यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या खुमासदार शैलीत तारांगणातील विविध दालने आणि भौतिकशास्त्रातील प्रयोगांची माहिती उपस्थितांना दिली. भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्या कामगिरीवर आधारित स्लाईड शोच्या माध्यमातून त्यांनी अवकाशातील विविध गमतीजमती उलगडून दाखवल्या.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे खगोल दुर्बिणीद्वारे घडवलेले आकाश दर्शन. यामध्ये विद्यार्थी आणि खगोल प्रेमींना सूर्य, चंद्र, गुरू ग्रह आणि तेजोमेघ यांचे दर्शन घडविण्यात आले. सुमारे २५० आबालवृद्धांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. विशेषतः विद्यार्थ्यांनी विचारलेल्या खगोलविषयक शंकांचे प्रा. सुतार यांनी अभ्यासपूर्ण निराकरण केले.
---
‘एक शहर, एक विज्ञान जत्रा'' उपक्रमाचा मानस
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ‘आनंदवन’चे विद्यार्थी, उपेंद्र बापट, निखिल पावस्कर आणि त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. रत्नागिरी नगर परिषदेचेही याकामी मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी बोलताना जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष महेश दामले यांनी ‘एक शहर, एक विज्ञान जत्रा’ या आगामी उपक्रमाची घोषणा केली. दरवर्षी अशा प्रकारचे वैज्ञानिक उपक्रम राबवून शहरात विज्ञानाची गोडी निर्माण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

