विद्यार्थिनींच्या कौशल्य विकास प्रशिक्षणला

विद्यार्थिनींच्या कौशल्य विकास प्रशिक्षणला

Published on

विद्यार्थिनींना शिक्षणासाठी बळ
वर्षा ढेकणे यांच्याकडून, विद्यार्थिनींना सहाय्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजप महिला मोर्चा दक्षिण रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका वर्षा ढेकणे यांनी ५० विद्यार्थिनींना शैक्षणिक आर्थिक सहाय्य प्रदान केले. आयफर व डॉ. जे. एस. केळकर मेमोरियल फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातील व कौशल्य विकास आधारित विविध अभ्यासक्रम व प्रशिक्षण कार्यक्रमातील या विद्यार्थिनींना भाजप कार्यालयात हे साह्य करण्यात आले.
या वेळी आयफरचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. हृषिकेश केळकर, संचालक अनिरुद्ध फळणीकर, गीतांजली लेले आदींनी वर्षा ढेकणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांचे विशेष आभार मानले. संस्थेतर्फे वर्षा ढेकणे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे, जिल्हा चिटणीस तथा पदवीधर प्रकोष्ठचे संयोजक मनोज पाटणकर, नगरसेविका मानसी करमरकर, महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस नुपुरा मुळ्ये, महिला मोर्चा, माजी जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या जठार, महिला मोर्चा शहराध्यक्ष भक्ती दळी व पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com