शिवजयंतीनिमित्त शोभायात्रा

शिवजयंतीनिमित्त शोभायात्रा

Published on

- rat७p११.jpg-
P२६O२९२४०
रत्नागिरी ः क्षत्रिय मराठा मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेली शोभायात्रा.

क्षत्रिय मराठा मंडळातर्फे
शिवजयंतीनिमित्त शोभायात्रा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : येथील क्षत्रिय मराठा मंडळातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे शिवजयंती तिथीनुसार अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरात जयस्तंभ ते मारुती मंदिर या मार्गावर छत्रपती शिवरायांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक आणि भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या सोहळ्यात मराठा बांधव आणि भगिनी पारंपरिक वेषभूषेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीयेला झाला असून, यंदा ही तिथी ६ मार्च रोजी होती. परंपरेनुसार सायंकाळी शहराजवळील ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री देवी भगवती मंदिर येथून शिवज्योतीचे प्रस्थान झाले. शिवज्योतीचे जयस्तंभ येथे आगमन झाल्यानंतर मुख्य शोभायात्रेला सुरुवात झाली. या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे विविध ढोल-ताशा पथके, झांजपथक, चित्तथरारक मर्दानी खेळ आणि महाराजांच्या जीवनावरील जिवंत देखावे सादर करणारे चित्ररथ. संपूर्ण मार्गावर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने वातावरण शिवमय झाले होते. मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली.
याप्रसंगी क्षत्रिय मराठा मंडळाचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे, माजी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, मंडळाचे पदाधिकारी राकेश नलावडे, प्रदीप साळवी, प्राची शिंदे यांच्यासह शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि शिवप्रेमी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com