चिपळूणमध्ये वडनाका शाखेतर्फे मोफत आरोग्य शिबीर

चिपळूणमध्ये वडनाका शाखेतर्फे मोफत आरोग्य शिबीर

Published on

- rat७p८.jpg-
P२६O२९२३३
चिपळूण ः शिवजयंतीनिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वडनाका शाखेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना शिवसैनिक.
-----
वडनाक्यात मोफत तपासणी शिबिर
शिवजयंतीनिमित्त आयोजन ; ठाकरेसेनेचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ : शिवजयंतीचे औचित्य साधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वडनाका शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ‘मोफत हाडांची कॅल्शिअम व घनता तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. वडनाका येथील एकवीरा देवी मंदिरात झालेल्या या शिबिराला स्थानिक नागरिक आणि गरजू रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला नवनिर्वाचित नगरसेवकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आरोग्य शिबिराचे उद्‍घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना नगरसेवक निहार कोवळे म्हणाले की, ‘मी वडनाक्यातच लहानाचा मोठा झालो. येथील शाखेची शिवजयंती आणि मंडळाचे सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम यांचा माझ्या जडणीघडणीवर मोठा परिणाम झाला आहे. आता हाच वारसा आणि संस्कार पुढे नेण्याची जबाबदारी आमच्यावर असून ती आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू.’
तसेच नगरसेविका नसरीन खडस म्हणाल्या, गेली ४० वर्षे मी ही शिवजयंती जवळून पाहत आहे. आपण सर्व एका कुटुंबाप्रमाणे हा उत्सव साजरा करतो. या कार्यक्रमाला ‘चिपळूणचा महाराजा’चे अध्यक्ष प्रवीण पेंडणेकर, बंधू कदम, संजय रेडीज, राहुल गुरव, पिंट्या कोवळे, पिंट्या पवार, मंदार शिंदे, बाळा गुरव, पार्थ जागुष्टे, समीर राऊत, किशोर राऊत, निकु रतवा, नारकर साहेब, सिद्धेश गुरव, सुशांत गुरव, राजेश कदम, आयुष कुबडे, प्रणव कदम, आदित्य पेडणेकर, शुभम शिंदे, पियुष गुरव, पार्थ गुरव, चंद्रकांत कोवळे, अथर्व चव्हाण, रतन कोवळे आणि सचिन चोरगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com