‘पीएचएन’, भोसले नॉलेज सिटीत करार

‘पीएचएन’, भोसले नॉलेज सिटीत करार

Published on

29261

‘पीएचएन’, भोसले नॉलेज सिटीत करार

तंत्रज्ञानासाठी उपयोग; अ‍ॅडव्हान्स लॅब उभारणार

सावंतवाडी, ता.७ : भोसले नॉलेज सिटीअंतर्गत कार्यरत विविध महाविद्यालयांनी पुणे येथील तंत्रज्ञान व कौशल्याधारित प्रशिक्षण देणाऱ्या ‘पीएचएन टेक्नॉलॉजी’ या संस्थेसोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला. या करारांतर्गत यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील पदवी व पदविका विभाग, तसेच यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी अशा तीन संस्थांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण व उद्योगाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
संस्थेमध्ये ‘अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी लॅब’ची स्थापना करणे, उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातील संवाद वाढविणे आणि विद्यार्थ्यांना ‘इंडस्ट्री ओरिएंटेड’ शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, हा या कराराचा मुख्य उद्देश आहे. करारानुसार संस्थेत उभारण्यात येणाऱ्या ‘अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी लॅब’मध्ये ड्रोन, थ्री-डी प्रिंटर, रोबोटिक डॉग, रोबोटिक आर्म, प्रगत सेन्सर्स, विविध तांत्रिक किट्स, एआय-एमएल आधारित उपकरणे तसेच सीएनसी प्लॉटर यांसारखी आधुनिक साधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल आणि त्यांची उद्योग क्षेत्रासाठीची तयारी अधिक सक्षम होईल.
याप्रसंगी भोसले नॉलेज सिटीचे सीईओ ले. कर्नल रत्नेश सिन्हा (नि.), वायबीआयटीचे प्राचार्य डॉ. रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले, वायबीसीपीचे प्राचार्य डॉ. विजय जगताप, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल अधिकारी मिलिंद देसाई, डॉ. तुषार रुकारी, प्रा. नमिता भोसले, सिव्हिल विभागप्रमुख प्रसाद सावंत, प्रा. मनोज खाडिलकर, प्रा. स्वप्नील राऊळ आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com