चिमुकल्यांतर्फे स्पर्धेतून स्वच्छतेचा संदेश

चिमुकल्यांतर्फे स्पर्धेतून स्वच्छतेचा संदेश

Published on

29262

चिमुकल्यांतर्फे स्पर्धेतून स्वच्छतेचा संदेश

कामत प्राथमिक शाळा; संत गाडगेबाबा जयंतीचे निमित्त

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ७ : स्वच्छतेचा मंत्र देणारे संत गाडगेबाबा यांची जयंती येथील सुधाताई कामत प्राथमिक शाळेत विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. अंगणवाडी ते ५ वी पर्यंतच्या चिमुकल्यांनी चित्रकला आणि घोषवाक्य स्पर्धेच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला.
या स्पर्धेमध्ये प्रियांशी गुप्ता हिने प्रथम क्रमांक पटकावून ट्रॉफी प्राप्त केली. द्वितीय क्रमांक अरहान शेख, तर तृतीय क्रमांक कबीर परब यांनी मिळवला. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक तेजस बांदिवडेकर, भावना गावडे, प्राची ढवळ, पूजा ठाकूर, रणजित सावंत, हेमांगी जाधव, अंगणवाडी सेविका अनुराधा पवार आणि मदतनीस अमिषा सासोलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी शिक्षकांनी गाडगे बाबांच्या जीवनकार्याचा आढावा घेत, त्यांनी हाती झाडू घेऊन समाज कसा स्वच्छ केला, याचे प्रेरक दाखले विद्यार्थ्यांना दिले. ‘‘मुलांच्या मनात स्वच्छतेची सवय बालवयातच रुजली, तरच उद्याचा भारत सुंदर होईल,’’ असा सूर मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.
अंगणवाडी व प्राथमिक गटाच्या (इयत्ता पहिली-दुसरी) विद्यार्थ्यांनी ‘माझी शाळा, स्वच्छ शाळा’ या विषयावर आकर्षक रंगकाम केले. तीसरी ते पाचवी या गटातील विद्यार्थ्यांनी चित्रकला आणि घोषवाक्य स्पर्धेत हिरीरीने भाग घेतला. ‘स्वच्छता पाळा, रोगराई टाळा’ अशा घोषणांनी शालेय परिसर दुमदुमून गेला. केवळ स्पर्धाच नव्हे, तर विद्यार्थ्यांनी स्वतःचे बाक आणि वर्ग परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचा प्रत्यक्ष धडा गिरवला. या निमित्ताने आयोजित स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com