रत्नागिरी - चिपळूणमधील रस्ते रुंदीकरण आराखड्याचे सादरीकरण
rat7p15.JPG
29266
चिपळूण - रस्ता रूंदीकरणाची माहिती सर्व नगरसेवकांना देण्यात आली.
रस्ते रुंदीकरण आराखड्याचे सादरीकरण
चिपळूणमध्ये सोमवारी नागरिकांसोबत बैठक; चार रस्त्याचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आणि दळणवळण अधिक सुलभ करण्यासाठी ‘चिंचनाका ते पॉवर हाऊस’, ‘चिंचनाका ते नगर पालिका’, ‘चिंचनाका ते बहादूरशेख नाका’ आणि ‘मध्यवर्ती बसस्थानक ते खेंड-बावशेवाडी’ या चार प्रमुख मार्गांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा सल्लागार देशपांडे यांनी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे सादर केला.
या वेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर आणि सर्व नगरसेवकांसमोर एलईडीच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले. यामध्ये रस्त्याची एकूण रुंदी, दुभाजक (डिव्हायडर), डांबरीकरणाची जागा, पेव्हर ब्लॉक, गटार व्यवस्था आणि पदपथांची (फुटपाथ) रचना कशी असेल, याची सविस्तर तांत्रिक माहिती देण्यात आली.
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सांगितले की, ‘‘प्रस्तावित रुंदीकरणामुळे बाधित होणारे नागरिक, व्यावसायिक आणि इतर स्थानिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी सोमवारी सकाळी ९ वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत नागरिकांना संपूर्ण आराखडा दाखवून त्यांच्याशी थेट संवाद साधला जाईल.’’
या पाहणी दौऱ्यात मुख्याधिकारी संजय जाधव, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, भूसंपादन विभागाचे ओंकार सकपाळ, बांधकाम मिस्त्री रविकांत सातपुते, अभियंता डफळ, आरोग्य विभागाचे वैभव निवाते, सुजित जाधव आणि रचना विभागाच्या श्रीमती खैरमोडे यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
चौकट
प्रशासकीय पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी
सादरीकरणानंतर नगराध्यक्ष, नगरसेवक आणि पालिका अधिकाऱ्यांनी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. चिंचनाका येथे मार्किंग करण्यात आले असून, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरापर्यंत पाहणीचा दौरा करण्यात आला. तसेच मध्यवर्ती बसस्थानक परिसरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतीच्या भागाचीही भूमापन विभाग आणि नगर पालिका अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

