दोडामार्ग केंद्रशाळेत पर्यावरणपूरक होळी

दोडामार्ग केंद्रशाळेत पर्यावरणपूरक होळी

Published on

दोडामार्ग केंद्रशाळेत
पर्यावरणपूरक होळी
दोडामार्ग, ता. ७ : येथील केंद्रशाळा क्र. १ मधील विद्यार्थ्यांनी उत्साहात रंगपंचमी साजरी केली. यावेळी नैसर्गिक रंगांचा वापर करून तसेच पाण्याचा अपव्यय टाळून ‘पर्यावरणपूरक होळी’ साजरी करण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.
या उपक्रमात शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी फुलांपासून नैसर्गिक रंग तयार करण्याची माहिती घेतली आणि एकमेकांना गुलाल लावून सणाचा आनंद लुटला.पर्यावरणपूरक उत्सवाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांनी रासायनिक रंगांऐवजी हळद, फुलांच्या पाकळ्या आणि वनस्पतीजन्य रंगांचा वापर केला. शाळेत रंग खेळण्यासोबतच या सणाचे सांस्कृतिक महत्त्वही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या उपक्रमातून द्वेष विसरून प्रेम, ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला. मुख्याध्यापक जयसिंग गावित, शिक्षिका एकता नाईक, वर्षा काळे आणि मनीषा रेडकर यांनी या कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन केले. या उपक्रमाला पालकांचेही मोठे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com