खनिजवाहू डंपर, ट्रकमध्ये अपघात

खनिजवाहू डंपर, ट्रकमध्ये अपघात

Published on

29297

खनिजवाहू डंपर, ट्रकमध्ये अपघात

गुळदुवेत अनर्थ टळला; वाहनांचे मोठे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
​आरोंदा, ता. ७ : गुळदुवे येथील धोकादायक उतारावर खनिज वाहतूक करणारा डंपर आणि ट्रक यांच्या अपघातात वाहनांचे नुकसान झाले.
ही घटना आज दुपारी घडली. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र डंपरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रस्त्याकडेला असलेल्या झाडामुळे डंपर खोल दरीत कोसळण्यापासून वाचला.
मळेवाडहून आरोंद्याच्या दिशेने मायनिंग वाहतूक करणारा हा डंपर जात होता. त्याच वेळी आरोंद्यावरून मळेवाडच्या दिशेने एक ट्रक येत होता. आरोंदा ‘खरी’ जवळील गुळदुवे येथील तीव्र उतारावर दोन्ही वाहने एकमेकांसमोर आले. यावेळी ट्रकच्या मागील बाजूला घासून डंपर चालकाचा ताबा सुटला आणि डंपर थेट रस्त्याकडेला जाऊन कलंडला. डंपर एका मोठ्या झाडाला अडकल्याने तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल दरीत कोसळता-कोसळता वाचला. अन्यथा, मोठी हानी होण्याची शक्यता होती.
---------
धोका वाढला
​या मार्गावरील रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडी वाढली असून रस्ते अत्यंत अरुंद आहेत. त्यामुळे वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यातच मायनिंग वाहतूक करणारे काही डंपर चालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वेगाने वाहने चालवतात. अशा बेजबाबदारपणामुळेच या भागात अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com