देवगडमध्ये आज दाखवणार चित्रपट
देवगडमध्ये आज
दाखवणार चित्रपट
देवगड, ता. ७ ः पालकमंत्री नीतेश राणे यांच्या सहकार्याने महिला दिनानिमित्त उद्या (ता.८) देवगड जामसंडे शहरातील महिलांसाठी ‘द केरला स्टोरी टू’ हा चित्रपट मोफत दाखवण्यात येणार आहे. देवगड जामसंडे शहर भाजप, युवा मोर्चा व महिला मोर्चा यांच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले आहे. हा चित्रपट येथील कंटेनर थिएटरमध्ये दाखवण्यात येणार असून मंगळवारपर्यंत (ता.१०) चित्रपटाचे दोन शो आयोजित करण्यात आले आहेत. या चित्रपट दाखवण्याच्या मोहिमेची सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी किशोरवयीन मुलींना हा चित्रपट दाखवण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

