साखरपा-ओणीच्या ज्योती पांचाळांची शिल्पकलेत राज्यस्तरावर झेप
महिला दिन विशेष---लोगो
-rat7p24.jpg-
29303
ज्योती पांचाळ
-rat7p25.jpg
29304
नेहरू सेंटर येथे निवडलेल्या दोन कलाकृती काष्ठशिल्प फणस आणि फायबर वर्कमधील उखळ, तसेच फायबरमधील मानवी पुतळा आणि देवीची मूर्ती.
शिल्पकलेत ‘चमकतेय’ ओणीची ज्योती!
राज्य कला प्रदर्शनात दोन कलाकृतींची निवड; वारशाला आधुकतेची जोड
अमित पंडित ः सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. ७ ः कला ही अनेकदा अंगभूत असते; परंतु तिच्यासोबत शास्त्रशुद्ध शिक्षणाची जोड मिळाली तर त्या कलेचे सौंदर्य आणि व्यापकता अधिक खुलून येते. ओणी येथील युवा मूर्तीकार ज्योती पांचाळ यांची वाटचाल याचे उत्तम उदाहरण आहे. पारंपरिक सुतारकामाच्या कुटुंबातून आलेल्या ज्योती यांनी वारशातून मिळालेल्या कलेला आधुनिक शिक्षणाची जोड देत शिल्पकलेच्या विविध माध्यमांत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरवात केली आहे.
सुतारकाम हा त्यांच्या कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय असल्याने लाकडी कामाची ओळख त्यांना होतीच. मात्र, या कलेला अधिक व्यापक स्वरूप मिळाले ते त्यांनी सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट्समध्ये घेतलेल्या शिक्षणामुळे. गेल्या शैक्षणिक वर्षात त्यांनी येथे फाउंडेशन कोर्स पूर्ण केला असून सध्या त्या जी. डी. आर्ट्सच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहेत.
या शिक्षणादरम्यान त्यांनी शिल्पकला हा विषय निवडत विविध माध्यमांतून शिल्पनिर्मितीचा अभ्यास केला. पारंपरिक काष्ठशिल्प आणि मातीच्या मूर्तींसोबतच त्यांनी लोखंडी भंगारातूनही आकर्षक शिल्पाकृती तयार केल्या. द्विमिती चित्रकलेबरोबरच फायबर ग्लाससारख्या माध्यमातून त्रिमिती शिल्पनिर्मितीही त्यांनी केली आहे. पोर्ट्रेट स्टडी करत असतानाच त्यांनी रिलीफ शिल्पनिर्मितीतही आपली कला साकारली. फाउंडेशन कोर्स करत असतानाच ज्योती पांचाळ यांनी आपल्या कलेची झलक दाखवण्यास सुरुवात केली. त्या वर्षी भरलेल्या ३१व्या वार्षिक कला प्रदर्शनात त्यांच्या दोन शिल्पांची निवड झाली आणि त्यांना विशेष पुरस्कारही मिळाला आहे.
---------
चौकट
काष्ठशिल्पातील फणसाला विशेष पसंती
यंदा त्यांच्या कलेची दखल राज्यस्तरावरही घेण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनासाठी त्यांच्या दोन कलाकृतींची निवड झाली. त्यांनी साकारलेल्या काष्ठशिल्पातील फणसाला विशेष पसंती मिळाली. तसेच फायबर वर्कमध्ये तयार केलेल्या कोकणातील पारंपरिक उखळ या कलाकृतीलाही स्थान मिळाले आहे. याच दोन कलाकृतींची निवड मुंबईतील नेहरू सेंटर येथे होणाऱ्या वुमन्स आर्ट्स एक्झिबिशनसाठी झाली आहे. येत्या १० मार्च रोजी हे प्रदर्शन भरत असून त्यात ज्योती यांच्या कलाकृती प्रदर्शित होणार आहेत.
----------
कोट
आगामी काळात सामाजिक विषयांवर आधारित शिल्पनिर्मिती करण्याची त्यांची इच्छा आहे. पारंपरिक माध्यमांसोबत आधुनिक माध्यमांचा वापर करत दोन्हींचा मिलाफ साधणारी शिल्पनिर्मिती करण्याचा मानस आहे. मूर्तीकामासोबतच प्रतिमा निर्मितीतही स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचे ध्येय आहे.''
- ज्योती पांचाळ
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

