रत्नागिरी-शिमग्यातील वादातून एकावर धारधार शस्त्राने खुनी हल्ला
शिमग्यातील वादातून एकावर खुनी हल्ला
तिघा हल्लेखोरांवर गुन्हा; मिरकरवाड्यात तणाव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : शिमग्यात झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात ठेवून मिरकरवाडा येथे शनिवारी (ता. ७) सकाळी एकावर धारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला. तिघा अज्ञात हल्लेखोरांनी शस्त्राने सपासप ९ वार करून तेथून पोबारा केला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयेंद्र ऊर्फ बावा नार्वेकर (रा. भाटीमिऱ्या) असे जखमीचे नवा आहे. या घटनेने मिऱ्या गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी (ता. ६) सकाळी १०:३० च्या सुमारास जयेंद्र नार्वेकर हे आपल्या मच्छीमार बोटीवर नेहमीप्रमाणे काम करत होते. यावेळी अचानक काही व्यक्तींनी बोटीवर येऊन त्यांच्यावर हल्ला चढवला. धारदार शस्त्राने त्यांच्या शरीरावर सपासप वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
भाटीमिऱ्या परिसरात शिमगोत्सवादरम्यान ‘रांगोळी’ काढण्यावरून मोठा वाद झाला होता. श्री नवलाई पावणाईच्या पालखी स्वागतासाठी रांगोळी काढत असताना धक्काबुकी झाली होती. त्यावेळी सुमारे १०० ते १५० लोकांचा जमाव समोरासमोर आला होता. या वादात जयेंद्र नार्वेकर यांचाही समावेश होता. मध्यस्थांनी तो वाद मिटवला होता, परंतु त्याचा राग काही तरुणांमध्ये होता. त्याचा वचपा काढण्यासाठी हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. हल्ला करणारे तिघे कोण, हल्ला का केला, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिस याप्रकरणी संशयितांचा शोध घेत आहेत. मिऱ्या परिसरात या घटनेमुळे तणावाचे वातावरण असून, पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

