गोगटे महाविद्यालयात सावरकर यांना अभिवादन

गोगटे महाविद्यालयात सावरकर यांना अभिवादन

Published on

गोगटे महाविद्यालयात
सावरकर यांना अभिवादन
रत्नागिरी, ता. ८ : गोगटे-जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना आत्मार्पणदिनाच्या निमित्ताने अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले. त्यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्र निर्मितीतील योगदानावर प्रकाश टाकला. जाज्वल्य राष्ट्र अभिमान हे स्वातंत्र्यवीर सावरकर विचार आणि कृतीच्या केंद्रस्थानी होते, असे ते म्हणाले. जातीभेद निर्मूलनासाठी त्यांनी केलेले कार्य महत्त्वाचे आहे. या वेळी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखेच्या उप-प्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, शास्त्र शाखेच्या उप-प्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि वाणिज्य शाखेच्या उप-प्राचार्या डॉ. सीमा कदम, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर उपस्थित होते. डॉ. मेघना म्हादये यांनी आभार केले.
------------------
पीएम उषा अंतर्गत अभ्यासक्रमांचे प्रमाणपत्र वितरण
रत्नागिरी, ता. ८ : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील (स्वायत्त) वनस्पतीशास्त्र विभागाच्यावतीने पीएम-उषा अनुदान अंतर्गत राबविण्यात आलेल्या ४५ तासांच्या दोन अभ्यासक्रमाचा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम ज. शं. केळकर सभागृहात नुकताच झाला. पीएम उषा समन्वयक तथा विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी प्रिपरेशन अँड एप्लीकेशन ऑफ ग्रीन मॅन्युअर अँड फर्टीलायझर या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे तसेच स्किल ऍन्हानसमेंट कोर्स इन लँडस्केप डिझाईनिंग अँड मेंटेनन्स या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. सोनाली कदम यांनी प्रास्ताविक केले. अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. विराज चाबके व प्रा. परेश गुरव यांनी संबंधित अभ्यासक्रमादरम्यानचे अनुभव सांगितले. या कार्यक्रमासाठी प्रमाणपत्र समन्वयक डॉ. यास्मिन आवटे, स्किल ऍनहानसमेंट कोर्स समन्वयक डॉ. चित्रा गोस्वामी उपस्थित होत्या. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी वनस्पतीशास्त्र विभागाच्या शैक्षणिक व उपक्रमशील कार्याचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com