रत्नागिरी- दिव्यांग मुलांच्या मातांचा सन्मान

रत्नागिरी- दिव्यांग मुलांच्या मातांचा सन्मान

Published on

rat8p2.jpg-
29403
रत्नागिरी : निवृत्त तरी कार्यरत समूहातर्फे दिव्यांग मुलांच्या मातांचा सन्मान मूकबधिर विद्यालयात करण्यात आला. त्याप्रसंगी महिलांसह शिक्षक, मुख्याध्यापक.

निवृत्त तरी कार्यरत समूहातर्फे
दिव्यांग मुलांच्या मातांचा सन्मान

रत्नागिरी, ता. ८ : राष्ट्र सेविका समितीअंतर्गत असलेल्या निवृत्त तरी कार्यरत या समूहाच्या वतीने दिव्यांग मुलांच्या मातांच्या जिद्दीला आणि कष्टाला सलाम करत त्यांना विशेष सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर शाळेमधील विद्यार्थी गौरांग भोसले याची आई गौरी भोसले आणि आविष्कार मतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थी भूषण धुळप याची आई शर्मिला धुळप या दोघींचा सन्मान करण्यात आला. या दोन्ही मातांना समूहातर्फे आर्थिक मदत देण्यात आली. त्याचबरोबर या क्षेत्रातील अनुभवांवर आधारित लेख असलेली प्रेरणादायी पुस्तकेही त्यांना भेट म्हणून देण्यात आली. केवळ मातांचाच नव्हे, तर दोन्ही विद्यार्थ्यांचाही उत्साह वाढवण्यासाठी त्यांना खाऊ आणि चित्रकलेची पुस्तके देण्यात आली.
या वेळी समूहातील सदस्यांनी दोन्ही मातांशी संवाद साधून मुले किती वर्षांपासून शाळेत येत आहेत, त्यांच्या प्रगतीचा आलेख कसा आहे आणि घरातील वातावरण याविषयी सविस्तर जाणून घेतले. तसेच समूहाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती त्यांना देण्यात आली. दोन्ही शाळांमधील इतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देण्यासाठी समूहातर्फे विशेष देणगी मूल्यही सुपूर्द करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी उमा दांडेकर यांनी, "जिये भूमीमाजी तुझा जन्म झाला, जिने पोसूनी पिंड हा वाढवीला, शिरी जाण बा ऋण हे थोर झाले, तुवा पाहिजे आजि ते फेडियेले," हा अर्थपूर्ण श्लोक सादर करून समाजऋण फेडण्याचे महत्त्व विषद केले. ''निवृत्त'' असूनही समाजासाठी ''कार्यरत'' राहण्याच्या या भावनेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या कार्यक्रमाचे वेळी उमा दांडेकर, अनुराधा ताटके, आरती दामले, प्रतिभा प्रभुदेसाई, अंजली प्रभुदेसाई, गीता जोशी या निवृत्त तरी कार्यरत समुह सदस्या, मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक गजानन रजपूत, शिक्षिका सीमा मुळ्ये, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com