रत्नागिरी- साहित्यरत्न पुरस्कारांचे वितरण
माहेर संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त
साहित्यरत्न पुरस्कारांचे वितरण
रत्नागिरी, ता. ८ : हातखंबा येथील माहेर संस्थेमध्ये २९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महाराष्ट्रातील ३० साहित्यिकांना माहेर साहित्यरत्न राज्यस्तरीय पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सुरुवातीला संस्थेतील मुले, मुली, महिला व पुरुषांनी नृत्याविष्कार केला. त्यानंतर या कार्यक्रमात संविधान प्रस्ताविकेचे वाचन माहेर सामाजिक कार्यकर्ते वृषभ खडसे यांनी केले. माहेर बालगृहाच्या अधीक्षका शीतल हिवराळे यांनी प्रास्ताविक केले. माहेर संस्थेचे प्रकल्प प्रमुख सुनील कांबळे लिखित लुसी कुरियन (दीदी) यांचे १०१ प्रेरणादायी विचार पुस्तिकेच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन हस्ते करण्यात आले. निवळी येथील (कै.) यशवंतराव माने विद्यालयातील गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आलेल्या ३० साहित्यिकांना माहेर साहित्यरत्न राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार-लेखक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. सुरेश नाईक, श्रद्धा कळंबटे, समृद्धी वीर, हर्षदा गावडे, महेंद्र मांडवकर, विद्या बोंबले, खेडशीचे माजी सरपंच भिकाजी गावडे, निवळीच्या सरपंच तन्वी कोकजे, शर्ली अँथोनी आदी उपस्थित होते. माधुरी पांचाळ यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

