आरोस येथे १९ मार्चपासून जिल्हा अभंग गायन स्पर्धा
आरोस येथे १९ मार्चपासून
जिल्हा अभंग गायन स्पर्धा
आरोंदा, ता.८ ः आरोस येथे गुढीपाडवा व रामनवमीच्या निमित्ताने दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. यावर्षीही श्री देव गिरोबा नाट्य मंडळ, आरोसच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित अभंग गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा दोन गटांमध्ये होणार आहे. यामध्ये १५ वर्षांपर्यंत बालगट व १५ वर्षांवरील खुला गट असे विभाग असतील. या स्पर्धेसाठी १२ मार्चपर्यंत जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे. स्पर्धकांनी मराठी भाषेतील संत रचित अभंग सादर करणे अनिवार्य आहेत. अभंग चित्रपट गीतांच्या चालीवर नसावा. सादरीकरणासाठी ५ ते ८ मिनिट वेळ दिला जाईल. स्पर्धेसाठी संगीत साथसंगत आयोजकांमार्फत पुरविली जाईल. स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी तबला व हार्मोनियमच्या साथीने आपल्या आवाजातील तीन ते चार मिनिटांचा व्हिडिओ व्हॉट्सॲप क्रमांकावर १२ मार्चपर्यंत पाठवायचा आहे. तज्ज्ञ परीक्षकांमार्फत व्हिडिओचे परीक्षण करून दोन्ही गटांसाठी प्रत्येकी २० स्पर्धकांची अंतिम निवड केली जाणार असून निवड झालेल्या स्पर्धकांना फोन करून निवडीबाबत कळविले जाईल. बाल गटातील स्पर्धा १९ मार्चला रात्री ८ वाजता तर मोठ्या गटातील स्पर्धा २० मार्चला रात्री ८ वाजता सुरू होईल. त्याच दिवशी बक्षीस वितरण केले जाईल. स्पर्धकाने आधारकार्ड आणणे आवश्यक आहे. लहान गटासाठी अनुक्रमे ५०००, ३००० व २०००, उत्तेजनार्थ दोन स्पर्धकांना प्रत्येकी १००० रुपये तसेच सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. मोठ्या गटासाठी ७५००, ५०००, ३००० व उत्तेजनार्थ दोन प्रत्येकी १५०० रुपये तसेच सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

