तारकर्लीत २० ला
स्वामी समर्थ जयंती

तारकर्लीत २० ला स्वामी समर्थ जयंती

Published on

तारकर्लीत २० ला
स्वामी समर्थ जयंती
मालवण ः तारकर्ली वायरीबांध येथील गणपत तारी यांच्या निवासस्थानी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ जयंती उत्सव २० मार्चला साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी १० वाजता श्री स्वामी समर्थांच्या कथांचे वाचन व प्रवचन, दुपारी १ वाजता श्रींची महाआरती, दुपारी १ ते ३ पर्यंत तीर्थप्रसाद, महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता भक्ती स्वरगंधा मालवण यांचा भक्तिसंगीत कार्यक्रम, ७ वाजता विनोद सातार्डेकर यांचे स्वामी समर्थ चरित्रावर कीर्तन, रात्री ९ वाजता भालचंद्र केळूसकर यांचे सुश्राव्य भजन होणार आहे. सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
......................
मुंबईत एप्रिलमध्ये
माजी विद्यार्थी मेळावा
कणकवली ः तालुक्यातील जवाहरलाल पूर्ण प्राथमिक निरोम शाळा क्र. १ या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ५ एप्रिलला मुंबई येथील सोशल लीग हायस्कूल, दामोदर हॉलजवळ, परेल पूर्व या ठिकाणी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत आयोजित केला आहे. मेळाव्यात शाळेच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करावयाच्या विविध उपक्रमांविषयी चर्चा करून त्याला मंजुरी घेतली जाणार आहे. सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी, माजी शिक्षक व ग्रामस्थांनी मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापक अमित पवार, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. पवार यांनी केले आहे.
......................
सासोलीत आगीत
काजू कलमे खाक
दोडामार्ग ः सासोली ग्रामपंचायतीच्या परिसरातील बागायतीत शनिवारी (ता. ७) दुपारी आग लागल्याची घटना घडली. वाऱ्यामुळे आग वेगाने पसरत गेल्याने परिसरातील काजू कलमे व जळावू लाकूड जळून मोठे नुकसान झाले. वेळीच अग्निशमन बंबाला पाचारण केल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. अंकुश नाईक, सोमेश गांजील, मनोज गवस, विशाल चव्हाण, सर्वेश देसाई, कल्पेश गांजील आदी ग्रामस्थांनी सहकार्य केले.
......................
कवठणी येथे आज
‘पाणिग्रहण’ नाटक
आरोंदा ः शिमगोत्सवानिमित्त कवठणी खालचीवाडी येथे स्फूर्ती नाट्य कला मंडळाच्यावतीने उद्या (ता. ९) रात्री १० वाजता प्रल्हाद अत्रे लिखित ‘पाणिग्रहण’ हा दोन अंकी नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. नाट्यरसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com