चौके-मांडखोल शाळेत महिला दिन उत्साहात
29433
चौके-मांडखोल शाळेत
महिला दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ८ ः मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौके मांडखोल शाळेत आज जागतिक महिला दिन शाळेच्या व शिवप्रेरणा विविध सेवा ट्रस्टच्यावतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी मुलांच्या स्वागत गीताने कार्यक्रम सुरू झाला. जिल्हा परिषद सदस्य अक्षता गावडे, पंचायत समिती सदस्या मानसी भोगावकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. अक्षता गावडे, मानसी भोगावकर यांच्यासह आरोग्य सेविका नेत्रा पोयेकर, ग्रामपंचायत सदस्या अक्षता गायकवाड, शालेय स्वयंपाकी मोहिनी गायकवाड, आशा स्वयंसेविका सिद्धली गावंडे, अंगणवाडी मदतनीस सिद्धी पार्टे, ज्येष्ठ महिला सौ. चव्हाण आदी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर महिलांच्या वेशभूषा स्पर्धा झाल्या. पोयेकर यांनी आरोग्य विषयी मार्गदर्शन केले. महिलांचे विविध खेळ घेण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. दुपारच्या सत्रात सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दीपक गोसावी व शिक्षक सुषण ढवण, शिवप्रेरणा ट्रस्ट अध्यक्ष मयूर गावडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यवान गावडे, आजी-माजी विद्यार्थी, महिला, पालक ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले. सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

