नेहा धयाटकर ‘सीए’ उत्तीर्ण
29471
नेहा धयाटकर ‘सीए’ उत्तीर्ण
मुणगे ः मुंबई-ठाणे येथील नेहा अतुल धयाटकर या चार्टर्ड अकाउंट परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे. या यशाबद्दल सामाजिक कार्यकर्ते व आदर्श शिक्षण समिती मुंबईचे विश्वस्त शांताराम गोवळकोट यांनी तिचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी तिचे वडील अतुल धयाटकर, आई स्वप्ना आणि समाजबांधव उपस्थित होते.
---
‘इस्रो’ भेटीची तन्मयला संधी
मालवण ः इस्कॉन या संस्थेमार्फत घेतलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मूल्यशिक्षण स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये येथील भंडारी ए. सो. हायस्कूलचा विद्यार्थी तन्मय परब याने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकाविला. त्याची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या म्हणजेच इस्रोच्या बँगलोर भेटीसाठी निवड झाली आहे. भगवद्गीता व तिचा जीवनातील उपयोग या विषयावर इस्कॉन संस्थेमार्फत ही ऑनलाईन स्पर्धा घेतली होती. यामध्ये तन्मयने यश मिळविले. त्याला भंडारी हायस्कूलचे शिक्षक एस. ए. अवसरे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल तन्मयचा इस्कॉन संस्थेतर्फे कणकवली बांधकरवाडी येथील श्रीकृष्ण मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. भंडारी एज्यूकेशन सोसायटी मुंबईचे अध्यक्ष विजय पाटकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, चेअरमन सुधीर हेरेकर, मुख्याध्यापक एच. बी. तिवले, पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे आदीनी त्याचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

