निवृत्तांसाठी आता ‘आरपार’ची लढाई
29479
निवृत्तांसाठी आता ‘आरपार’ची लढाई
सावळाराम अणावकर ः कुंभारमाठ येथे निवृत्त शिक्षकांचा ‘आनंद मेळावा’
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ८ ः जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना अनेक वेळा निवृत्त शिक्षकांच्या प्रश्नांबाबत निवेदने दिली. प्रत्येक वेळी आश्वासने मिळाल्याने आंदोलने मागे घेण्यात आली. यावेळी त्यांना पुन्हा निवेदनाद्वारे प्रश्न सोडविण्यास सांगितले आहे. यावेळी जर प्रश्न सोडविले नाहीत तर मी स्वतः उपोषणाला बसणार आहे. तुम्ही सर्व शिक्षकांनी मला साथ द्यावी, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनचे जिल्हाअध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी केले.
मालवण तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, पदवीधर, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि कुटुंबवेतन धारक यांचा आनंदमेळावा नुकताच मालवण तालुकाध्यक्ष विजय चौकेकर यांच्या अध्यक्षतेखाली जानकी मंगल कार्यालय, कुंभारमाठ येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते.
विचारमंचावर जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दळवी, ना. य. सावंत, जिल्हा सरचिटणीस सुंदर पारकर, जिल्हा सदस्य कृष्णा पाताडे, सरिता मुननकर, रुद्राजी भालेकर आणि मनोहर जोगल, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष झिलू गोसावी, कणकवली तालुकाध्यक्ष शंकर बागवे, माजी तालुकाअध्यक्ष चंद्रकांत तेली, माजी सचिव अनिल मालवदे, उपाध्यक्ष शिवराम सुतार, सावंतवाडी तालुकाध्यक्ष रामनाथ राऊळ, देवगड तालुकाध्यक्ष मधुकर राणे, सचिव रावजी परब, सेवानिवृत्त सैनिक मधुसुदन सारंग आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सानेगुरुजींच्या ‘खरा तो एकचि धर्म’ या प्रार्थनेने करण्यात आली. दिवंगतांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सचिव अरुण गोसावी यांनी प्रास्ताविक केले.
ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक श्रीकृष्ण पाडगांवकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रकाश दळवी, मालवण तालुक्याने आनंद मेळावा खऱ्या अर्थाने सर्व शिक्षकांकडून कृतीतून उतरवून घेतला, असे सांगितले. विजय चौकेकर यांनी, मेळाव्यात रंजकता आणून जिल्ह्याला मार्गदर्शक ठरेल, असा स्नेहमेळावा साजरा करीत असल्याचे कौतुकोद्गार काढले. ना. य. सावंत, सुंदर पारकर, झिलू गोसावी, शंकर बागवे, मधुकर राणे, रामनाथ राऊळ यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुगंधा गुरव यांनी केले.आभार रामचंद्र वाळके यांनी मानले.
....................
निवृत्त शिक्षकांचा पुरस्काराने सन्मान
मालवण तालुक्यातील नुकतेच सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना गुरुवर्य जीवनसाधना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांचा शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प, ग्रंथभेट आणि सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या शिक्षकांना अमृतमहोत्सवी शिक्षण तपस्वी पुरस्कार शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, ग्रंथभेट आणि सन्मानपत्र देऊन प्रदान करण्यात आला. उपस्थित सेवानिवृत्त शिक्षकांनी आपले कलागुण सादर केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

