क्रिकेट स्पर्धेत ‘महापुरुष पिंगुळी’ विजेते

क्रिकेट स्पर्धेत ‘महापुरुष पिंगुळी’ विजेते

Published on

29481

क्रिकेट स्पर्धेत ‘महापुरुष पिंगुळी’ विजेते

‘सिंधुकन्या चषक २०२६’; ‘देवगड स्टार गर्ल्स’ उपविजेते

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ८ ः साळगाव महाविद्यालय येथे घेण्यात आलेल्या महिलांच्या जिल्हास्तरीय अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत ‘सिंधुकन्या चषक २०२६’चा मानकरी महापुरुष शेटकरवाडी-पिंगुळी संघ ठरला. उपविजेता देवगड स्टार गर्ल्स, तर तृतीय क्रमांक सिंधुकन्या कुडाळ यांनी मिळविला.
शिव छत्रपती प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि युवा उद्योजक उदय कदम पुरस्कृत प.पू. विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय, साळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी जिल्हास्तरीय अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाच्या पटांगणावर केले होते. उद्‍घाटनप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या व चेंदवण माजी उपसरपंच रश्मी नाईक, राज्य उत्पादन शुल्क विभाग सिंधुदुर्ग पोलिस दत्तप्रसाद उर्फ काका कालेलकर, युवा उद्योजक उदय कदम, संदीप चेंदवणकर, महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन पाटकर, विजय मोर्ये, लक्ष्मण आगलावे, क्रीडाप्रेमी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी रोशन तेंडुलकर, साक्षी चेंदवणकर, निखिल बावकर आदींनी योगदान दिले. कर्णधार डॉ. प्रियांका कुडाळकर (सिंधुकन्या कुडाळ), कोकणकन्या वॉरियर (चेंदवण), सायली राऊळ (महापुरुष, शेटकरवाडी पिंगुळी), सावंतवाडी गर्ल्स, सावली स्पोर्ट्स सावंतवाडी,  तनवी ईरनाईक (देवगड स्टार गर्ल्स), एस.पी.एस. आवेरा आदी संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला.
मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ झाला. विजेत्या संघाला ५००० व चषक, उपविजेत्याला ३००० व चषक तसेच अंतिम सामना वीरांगना सायली राऊळ (महापुरुष शेटकरवाडी पिंगुळी), मालिका वीरांगना सरिता उपरकर (देवगड स्टार गर्ल्स), उत्कृष्ट फलंदाज सायली राऊळ (महापुरुष शेटकरवाडी), उत्कृष्ट गोलंदाज दिव्या (महापुरुष शेटकरवाडी), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सविता पारकर (सिंधुकन्या कुडाळ) यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com