मालवण वरेरकर नाट्यगृह दुरुस्तीसाठी एक कोटी द्या
29507
मालवण वरेरकर नाट्यगृह
दुरुस्तीसाठी एक कोटी द्या
नगराध्यक्षांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ८ ः ‘शहरातील मामा वरेरकर नाट्यगृह दुरुस्तीसाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा,’ या मागणीचे निवेदन नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना दिले.
मामा वरेरकर नाट्यगृह हे सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. नाट्यगृहाची इमारत जुनी झाल्यामुळे खुर्चा, रंगकाम, विद्युत व्यवस्था, बैठक व्यवस्था, तसेच इतर नागरी सुविधा यामध्ये दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे. नाट्यगृहाची पाहणी केल्यानंतर आवश्यक दुरुस्तीकामाचे अंदाजपत्रक तयार केले असून, हे काम तातडीने करणे आवश्यक आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर नाट्यगृहाची सुरक्षितता व उपयुक्तता वाढेल, तसेच नागरिकांना व विविध सांस्कृतिक संस्थांना उत्तम सुविधा उपलब्ध होतील. या नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी एक कोटी रुपये निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे, आमदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे नगराध्यक्ष वराडकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

