राजा शिवाजी चौक मंडळातर्फे
खलील, मुद्राळे यांचा सत्कार

राजा शिवाजी चौक मंडळातर्फे खलील, मुद्राळे यांचा सत्कार

Published on

29514

राजा शिवाजी चौक मंडळातर्फे
खलील, मुद्राळे यांचा सत्कार
सावंतवाडी ः सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सचिव समीरा खलील व रुपा मुद्राळे यांच्या सेवाभावी कार्याची दखल राजा शिवाजी चौक मित्रमंडळाने घेतली आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या दोन्ही रणरागिणींचा सत्कार करण्यात आला. ​समीरा खलील व रुपा मुद्राळे निराधार, दिव्यांग आणि गरजू रुग्णांना सातत्याने मदत करण्यासोबतच अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे, निराधारांना पेन्शन योजना मिळवून देणे आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी धावून जाणे अशा कामांत अग्रेसर असतात. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी राजा शिवाजी चौक मित्रमंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ​याप्रसंगी मंडळाचे सल्लागार बबन साळगावकर, बंटी माठेकर, विजय पवार, बंड्या तोरस्कर, पुंडलिक दळवी, डुमिंग आल्मेडा, बावतीस फर्नांडिस, सौ. फर्नांडिस, आशा परेरा, इप्तिकार राजगुरू, मनोज घाटकर, डायमंड शेख, लक्ष्मण कदम, रवी जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या दोन्ही रणरागिणींच्या कार्याचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com